शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्प २0१८ : ‘विकास पुरुष’ ते ‘गरिबांचा नेता’, नरेंद्र मोदी यांची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 01:44 IST

नरेंद्र मोदी यांनी २0१४ मध्ये स्वत:ला ‘विकास पुरुष’ म्हणून देशासमोर उभे करून लोकसभेच्या निवडणुका जिंकल्या होत्या. आता त्याच मोदी यांची २0१९ च्या निवडणुकीआधी त्यांना ‘गरिबांचा नेता’ म्हणून प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे यंदाच्या अर्थसंकल्पावरून दिसत आहे.

नवी दिल्ली - नरेंद्र मोदी यांनी २0१४ मध्ये स्वत:ला ‘विकास पुरुष’ म्हणून देशासमोर उभे करून लोकसभेच्या निवडणुका जिंकल्या होत्या. आता त्याच मोदी यांची २0१९ च्या निवडणुकीआधी त्यांना ‘गरिबांचा नेता’ म्हणून प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे यंदाच्या अर्थसंकल्पावरून दिसत आहे.राहुल गांधी यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष असताना २0१५ मध्ये नरेंद्र मोदींवर ‘सूट-बूट की सरकार’ अशी टीका केली होती. त्यातच बिहारची निवडणूकही भाजपला गमवावी लागली होती, तेव्हापासूनच मोदींनी स्वत:ची गरिबांचा नेता म्हणून प्रतिमा तयार करण्याचे ठरवले, असे जाणवते. तेव्हापासून मोदींनी स्वत:ला मोठ्या उद्योगपतींपासून दूर ठेवले.आगामी निवडणुकीत ‘गरिबांचा नेता’ म्हणूनच मोदी जनतेला सामोरे जाणार आहेत, असे स्पष्ट संकेत वित्तमंत्री जेटली यांनी अर्थसंकल्पीय भाषणात दिले. सूत्रांनी सांगितले की, मोदींनी दिलेले नोकºयांचे आश्वासन २0१९ च्या आत पूर्ण करणे अशक्य आहे. त्यामुळे देशाचा मध्यमवर्ग नाराज आहे. शेती संकटात असल्यामुळे ग्रामीण भाग नाराज आहे. या परिस्थितीत ‘गरिबांचे नेता’ अशी प्रतिमा उभी करणे मोदींसाठी आवश्यक होते. ही प्रतिमा तयार करण्यासाठी मोदींनी पाच कलमी कार्यक्रम आखला आहे. त्यातील एक आहे उज्ज्वला योजना, तर दुसरी आहे सौभाग्य योजना. याद्वारे गरिबांच्या घरात गॅस सिलिंडर व वीज जोडणी दिली जात आहे. तिसरी आहे स्वच्छ भारत योजना ज्यात गरिबांना मोफत शौचालय बांधून दिली जातील. चौथी योजना ही शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांतील गरिबांना स्वस्तात घरे उपलब्ध करून देते. पाचवी आणि सर्वांत महत्त्वाकांक्षी योजना सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात जाहीर केली. ती म्हणजे आरोग्य संरक्षण योजना. ‘ओबामा केअर’च्या धर्ती हिला ‘मोदी केअर’ म्हटले गेले आहे.निवडणुकीची पंचसूत्रीसूत्रांच्या मते, गरिबांच्या घरात गॅस सिलिंडर, वीज कनेक्शन,घरापाशी स्वच्छतागृहे, परवडणारी घरे आणि आरोग्य कवच या पाच सूत्रांच्या आधारे मोदी २0१९ च्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBudget 2018अर्थसंकल्प २०१८Budgetअर्थसंकल्पIndiaभारत