शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

"बसपा कार्यकर्त्यांना कोणाशीही लग्न करण्यास स्वातंत्र्य...", मायावतींनी ठामपणे सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 17:55 IST

बसपा सुप्रिमो मायावती म्हणाल्या की, कोण कोणत्या पक्षाच्या लोकांशी नातेसंबंध जोडत आहे, याच्याशी पार्टीचा काहीही संबंध नाही.

अलीकडेच बहुजन समाज पार्टीच्या (BSP) एका नेत्यानं आपल्या मुलाचं लग्न समाजवादी पार्टीच्या (SP) आमदाराच्या मुलीशी केल्यामुळं पार्टीतून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी समोर आली होती. दरम्यान, बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी शनिवारी या वृत्ताचं खंडन केलं आहे. त्या म्हणाल्या की, बसपाच्या कार्यकर्त्यांना कोणाशीही लग्न करण्यास स्वातंत्र्य आहे.

बसपा रामपूरचे माजी अध्यक्ष सुरेंद्र सागर यांच्या मुलाने नुकतेच आंबेडकरनगर जिल्ह्यातील आलापूर येथील समाजवादी पार्टीचे आमदार त्रिभुवन दत्त यांच्या मुलीशी लग्न केले आहे. यापूर्वी त्रिभुवन दत्त हे बसपामध्ये होते, परंतु 2022 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला. 

बसपा सुप्रिमो मायावती म्हणाल्या की, कोण कोणत्या पक्षाच्या लोकांशी नातेसंबंध जोडत आहे, याच्याशी पार्टीचा काहीही संबंध नाही.  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टद्वारे मायावती यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्या म्हणाल्या की, सुरेंद्र सागर आणि रामपूरमधील बसपाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष प्रमोद कुमार यांची त्यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे पार्टीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. याचा लग्नाशी काहीही संबंध नाही. 

सुरेंद्र सागर आणि प्रमोद कुमार यांच्यातील वाद शिगेला पोहोचला होता, त्यामुळे पार्टीच्या कामावर परिणाम होत होता. त्यांच्या वादाचा पार्टीच्या कामावर परिणाम होऊ नये, यासाठी या दोघांची एकत्र पार्टीतून हकालपट्टी करण्यात आली. कोण कोणत्या पार्टीच्या लोकांशी नातेसंबंध जोडतो, त्याचा पार्टीशी काहीही संबंध नाही. लोक त्यांना हवे तिथे नाते जोडू शकतात. हे सर्व त्यांच्या विचारसरणीवर अवलंबून आहे, परंतु याविषयी खोटा प्रचार करणाऱ्या लोकांपासून सावध राहिले पाहिजे, असेही मायावती म्हणाल्या.

टॅग्स :mayawatiमायावतीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीPoliticsराजकारणUttar Pradeshउत्तर प्रदेश