शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

चंद्रशेखर रावण यांच्या सहकार्याने काँग्रेस देणार बसपाला दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 07:04 IST

नवी समीकरणे : प्रियंका गांधी : चंद्रशेखर यांच्यात चर्चा

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील दलित नेते चंद्रशेखर आझाद रावण यांच्याशी चर्चा केल्यानंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठा संदेश गेला आहे. आपल्या आघाडीतून काँग्रेसला बाहेर ठेवण्यासाठी कठोर भूमिका घेणाऱ्या बसपाच्या प्रमुख मायावती यांच्यासाठी हा मोठा राजकीय संकेत मानला जात आहे.पश्चिम उत्तर प्रदेशात चंद्रशेखर आझाद रावण यांनी अलीकडच्या काळात दलितांमधील आपली हजेरी वाढविली आहे. तथापि, या चर्चेबाबत बसपामध्ये मोठा असंतोष असल्याची बाब समोर आली आहे. अर्थात, मायावती यांनी या चर्चेबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. असे सांगितले जात आहे की, सपा-बसपा आघाडीतून काँग्रेसला बाहेर ठेवण्यात मायावती यांची महत्त्वाची भूमिका होती. यामुळे काँग्रेस नाराज आहे. त्यामुळेच त्यांनी चंद्रशेखर यांच्या निमित्ताने बसपाला राजकीय मात देण्याचा निश्चय केला.चंद्रशेखर आझाद रावण म्हणतात की, ते बहुजन समाजात जन्मले आहेत आणि त्यातच अखेरपर्यंत राहू. मायावतींकडून याच समाजाचे राजकारण केले जाते. आपले नेते म्हणून चंद्रशेखर आझाद रावण हे कांशीराम यांचे नाव घेतात. कांशीराम हे आपले आदर्श असल्याचे ते सांगतात. त्यामुळे बसपा अधिक अस्वस्थ होत आहे. त्यामुळेच चंद्रशेखर यांच्याबाबत मायावती यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की, त्यांना पक्षात का घेतले जात नाही? त्याच्या प्रत्युत्तरात त्यांनी सांगितले की, काही लोक लाभ घेण्यासाठी पुढे येऊ इच्छितात. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी चंद्रशेखर आझाद रावण यांच्याशी चर्चा करून हे संकेतही दिले आहेत की, त्या आपल्या पक्षात तरुणांची आणि विशेषत: दलित तरुणांची फौज तयार करण्यात व्यस्त आहेत. उत्तर प्रदेशात ही उणीव चंद्रशेखर आझाद यांच्या रूपाने समाप्त होताना दिसत आहे. यामुळे काँग्रेसला उत्तर प्रदेशात दलित मते वाढविण्यास मदत तर होईलच; पण एक मजबूत जनाधार असणारा दलित वक्ताही मिळणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPriyanka Gandhiप्रियंका गांधीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीSamajwadi Partyसमाजवादी पार्टी