शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : मायावतींची आज दिल्लीत कोणतीही बैठक नाही - बसपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 10:25 IST

बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती सोमवारी दिल्लीत विरोधी पक्षांची भेट घेणार होत्या. मात्र बसपाने आज दिल्लीत होणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत मायावती सहभागी होणार नसल्याची माहिती दिली आहे.

ठळक मुद्देबसपाने आज दिल्लीत होणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत मायावती सहभागी होणार नसल्याची माहिती दिली.'बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती दिल्लीत विरोधी पक्ष नेत्यांबरोबर कोणतीही बैठक करणार नाहीत' असं पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. 'मायावतीजींचा आज दिल्लीमध्ये कोणताही कार्यक्रम अथवा बैठक नाही. त्या लखनौमध्ये असणार आहेत'

लखनौ - बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती सोमवारी (20 मे) दिल्लीत विरोधी पक्षांची भेट घेणार होत्या. मात्र बसपाने आज दिल्लीत होणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत मायावती या सहभागी होणार नसल्याची माहिती दिली आहे. 'बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती दिल्लीत विरोधी पक्ष नेत्यांबरोबर कोणतीही बैठक करणार नाहीत' असं पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

लोकसभा निवडणुकांच्या 23 मे रोजी लागणाऱ्या निकालानंतरची रणनीती ठरवण्यासाठी बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती या यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची सोमवारी भेट घेणार होत्या. मात्र बसपाने आज भेट घेणार नसल्याचं सांगितलं. 'मायावतीजींचा आज दिल्लीमध्ये कोणताही कार्यक्रम अथवा बैठक नाही. त्या लखनौमध्ये असणार आहेत' अशी माहिती बसपा नेते सतिश चंद्र मिश्रा यांनी दिली आहे. 

चंद्राबाबूंच्या भेटीगाठी जोरात, लखनौमध्ये केली अखिलेश, मायावतींशी चर्चा

लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीत नरेंद्र मोदी आणि भाजपाला पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी कंबर कसली आहे. निकालांनंतर विरोधी पक्षांची एकजूट करून सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, त्यासाठी चंद्राबाबू नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यानंतर बसपाप्रमुख मायावती आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचीही भेट घेतली.

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. दरम्यान, 23 मे रोजी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपाचे बहुमत हुकल्यास मोदींना सत्ता हस्तगत करता येऊ नये, यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पुढाकार घेत विरोधी पक्षांच्या नेत्यांची एकजूट करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा एक भाग म्हणून चंद्राबाबू नायडू यांनी आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.  लोकसभेत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला तरी सर्व विरोधी पक्षांना एकत्र करून कर्नाटकप्रमाणे सरकार स्थापन करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे.

चंद्राबाबू नायडू यांनी सुरू केलेल्या मोर्चेबांधणीमुळे तिसऱ्या मोर्चाच्या स्थापनेची शक्यता वाढली आहे. दरम्यान, भाजपाला सत्तेतून रोखण्यासाठी आम्ही प्रसंगी पंतप्रधानपदावरील दावेदारीही सोडू, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटले होते. नंतर त्यांनी आपल्या विधानापासून धुमजाव केले होते. मात्र भाजपाला बहुमत न मिळण्याच्या परिस्थितीत काँग्रेस विरोधी पक्षातील कुठल्याही नेत्याला पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देण्याची शक्यता आहे.  विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी चंद्राबाबू प्रयत्नशील असले तरी बसपाप्रमुख मायावती आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. उत्तर प्रदेशातील महाआघाडीमधील हे नेते 23 मे रोजी निकाल स्पष्ट झाल्यावरच आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९mayawatiमायावतीdelhiदिल्लीSonia Gandhiसोनिया गांधी