शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
6
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
7
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
8
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
9
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
10
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
11
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
12
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
13
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
14
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
15
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
16
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
17
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
18
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
19
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
20
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप

BSNLमधील हिस्स्याच्या विक्रीबाबत सरकारचं मोठं वक्तव्य, पाहा काय म्हटलंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 11:56 IST

BSNL Disinvestment: सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी (Government Telecom Company) भारत संचार निगम लिमिटेडच्या (BSNL) निर्गुंतवणुकीबाबत (Disinvestment) सरकारकडून मोठे विधान समोर आले आहे.

BSNL Disinvestment: सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी (Government Telecom Company) भारत संचार निगम लिमिटेडच्या (BSNL) निर्गुंतवणुकीबाबत (Disinvestment) सरकारकडून मोठे विधान समोर आले आहे. सरकार सध्या बीएसएनएलच्या निर्गुंतवणुकीचा विचार करत नसल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपनी बीएसएनएलच्या निर्गुंतवणुकीची कोणतीही योजना नसल्याचं सरकारनं लोकसभेत स्पष्ट केलं.

लोकसभेतील डीएमकेचे खासदार डीएम कथीर आनंद यांनी बीएसएनएलच्या निर्गुंतवणुकीसाठी कंपनीची मालमत्ता विचारात घेतली जाईल का, असा प्रश्न विचारला होता. यावर राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी उत्तर दिलं. "आतापर्यंत बीएसएनएलच्या निर्गुंतवणुकीची कोणतीही योजना नाही," असं त्यांनी स्पष्ट केलं. सरकारकडून भवन, जमीन, टॉवर आणि दूरसंचार उपकरणांसह बीएसएनएलच्या स्थावर मालमत्तेची माहिती मागणवण्यात आली आहे.

किती आहे संपत्ती?मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, बीएसएनएलच्या सर्व सर्कलमध्ये ३२६६ इमारती, १३८८ टॉवर आणि सॅटेलाईट, २१०४२ दूरसंचार उपकरणे आणि ६८६ नॉन-टेलिकॉम उपकरणे आहेत. टेलिकॉम उपकरणांमध्ये प्लांट, केबल, कॉम्प्युटर सर्व्हर, इन्स्टॉलेशन चाचणी करणारी उपकरणे, लाईन्स आणि वायर्स यांचा समावेश होतो. तर नॉन टेलिकॉम उपकरणांमध्ये कम्प्युटर एन्ड वापरकर्ते उपकरणे, इलेक्ट्रिकल फिटिंग्ज, फर्निचर आणि फिक्स्चर, ऑटोमोटिव्ह आणि लॉन्च यांचा समावेश होतो.

२७ हजार कोटींचं कर्जआर्थिक वर्ष २०२१ मध्ये BSNL ची एकूण मालमत्ता ५१,६८६.८ कोटी रुपये इतकी झाली. मागील वर्षी ती ५९,१३९.८२ कोटी रुपये होती. कंपनीचे थकित कर्ज आर्थिक वर्ष २०१९-२० मधील २१,६४७.७४ कोटी रुपयांवरून २०२०-२१ मध्ये वाढून २७,०३३.६ कोटी रुपये झाले.

टॅग्स :BSNLबीएसएनएलGovernmentसरकारlok sabhaलोकसभा