शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सूर्य कोपला! राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; जवानानं पापड भाजून दाखवला, नेटकरी गहिवरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 16:35 IST

भीषण गर्मी आणि उन्हाचा कहर पाहायला मिळत आहे.

सध्या देशातील विविध राज्यांमध्ये भीषण गर्मी आहे. उष्णतेली लाट पाहता अनेक राज्यांमध्ये दुपारच्या वेळेस शक्यतो घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जात आहे. भीषण गर्मी आणि उन्हाचा कहर पाहायला मिळत आहे. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून राजस्थानमधील बिकानेरमध्ये असलेल्या उन्हाची तीव्रता तुम्ही अनुभवू शकता. खरे तर या जवानाने रेतीत पापड ठेवला असता अवघ्या काही वेळात तो जवळपास ७० टक्के भाजून निघाला. 

काही मिनिटांतच पापड भाजून निघाल्याने बिकानेर येथे उन्हाची तीव्रता काय आहे याची कल्पना करू शकता. पण, एवढ्या कडक उन्हात देखील आपल्या रक्षणासाठी भारतीय जवान तैनात असल्याचे पाहून अनेकांनी त्यांच्या देशसेवेला दाद दिली. कमेंटच्या माध्यमातून नेटकरी जवानांच्या कार्याला सलाम करत आहेत. राजस्थानमधील बिकानेर येथे तब्बल ४७ सेल्सिअस इतके तापमान आहे. BSF जवानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरी कमेंटच्या माध्यमातून देशसेवा करणाऱ्या जवानांच्या कार्याचे कौतुक करताना दिसत आहेत. 

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया...भारतीय जवानाच्या कार्याला सलाम करताना एकाने म्हटले की, भारतीय जवानांचे कौतुक करण्यासाठी शब्द देखील अपुरे पडतील. तर, जवानांचे जीवन खूप कठीण आणि संघर्षमय असते. त्यांच्या या देशसेवेसाठी कडक सॅल्युट, असे एका युजरने कमेंटच्या माध्यमातून म्हटले. 

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) भारतातील बहुतांश भागात २५ मे पर्यंत तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने जोधपूर आणि बिकानेरसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर राजस्थानातीलच पिलानी येथे पुढील २८ तासांत ४८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानSocial Viralसोशल व्हायरलBSFसीमा सुरक्षा दल