शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

BSFने तयार केली खास लॅब; सीमेपलीकडून येणार्‍या ड्रोनवर कशी ठेवणार नजर? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 6:44 PM

भारत-पाकिस्तान सीमेवर ड्रोन घुसखोरीच्या घटनांमध्ये दुपटीने वाढ झाल्याने बीएसएफने खास लॅब उभारली आहे.

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान सीमेवर ड्रोन घुसखोरीच्या घटनांमध्ये दुपटीने वाढ झाल्यानंतर देशात पहिल्यांदाच गृह मंत्रालय आणि तज्ज्ञ एजन्सीने खास लॅब विकसित केली आहे. या लॅबमध्ये घुसखोर ड्रोनची दोन प्रकारे तपासणी केली जाणार आहे. यामध्ये सीमेवर दिसणारे आणि दुसरे म्हणजे मारले गेलेले ड्रोन, अशी तपासणी केली जाईल.  बीएसएफचा ही खास लॅब मागील काही महिन्यांत सुरक्षा दलांनी विकसित केली आहे. भारतीय सीमेत घुसखोरी करणाऱ्या ड्रोनवर ते लक्ष ठेवणार आहे. 

ड्रोन यूएव्ही सायबर फॉरेन्सिक लॅब विकसित करणार्‍या एजन्सींना विश्वास आहे की, ही लॅब भारतावर पसरलेल्या सध्याच्या ड्रोन धोक्याचा सामना करण्यासाठी खूप प्रभावी सिद्ध होईल. या लॅबमध्ये असे खास तंत्र असणार आहे, ज्याद्वारे ड्रोनमध्ये बसवलेले जीपीएस ओळखता येईल. ड्रोनमध्ये असलेल्या जीपीएसच्या मदतीने सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांना हे ड्रोन कुठून पाठवले गेले आणि कुठे गेले याची माहिती मिळू शकणार आहे. 

BSFने तयार केली खास लॅबयाशिवाय या लॅबमध्ये असलेल्या विशेष तंत्रज्ञानामुळे शत्रूने पाठवलेल्या ड्रोनचे लोकेशन पाहता येईल. तसेच ते ड्रोन किती काळ हवेत होते याचा कालावधी देखील कळणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे या लॅबमध्ये जप्त केलेल्या ड्रोनच्या हार्डवेअरसह पाकिस्तानी डेटाही हॅक केला जाऊ शकतो. बीएसएफचे डीजी पंकज सिंह यांनी सांगितले की, गृह मंत्रालयाच्या सहकार्याने अशी लॅब सध्याच्या काळाची गरज आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन ही लॅब तयार करण्यात आली आहे. पाकिस्तान भारतात ड्रग्ज तस्करी करण्यासाठी नेव्हिगेट टू होम ड्रोनचा वापर करत आहे.

सीमेवर ड्रोन पाहण्याच्या घटनांमध्ये दुपटीने वाढ दरम्यान, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी भारत-पाकिस्तान सीमेवर ड्रोन पाडण्याच्या आणि ड्रोन पाहण्याच्या घटनांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. यावरून पाकिस्तानच्या कुरघोडींचा अंदाज लावला जाऊ शकतो. गेल्या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये तब्बल १०९ वेळा ड्रोन भारतीय सीमेवर घिरट्या घालताना दिसले होते. तर यावर्षी आतापर्यंत ही संख्या २२४ च्या पुढे गेली आहे. त्यामुळे आता या लॅबच्या मदतीने ड्रोनची यंत्रणा कोणत्या देशातून चालवली जाते, हार्डवेअर कुठे आहे, याची माहिती मिळणार आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलBorderसीमारेषाIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी