शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिला कॉन्स्टेबलचा BSF महिनाभरापासून घेतंय शोध, या कारणामुळे सुरक्षा यंत्रणांचं वाढलंय टेंन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 15:08 IST

BSF Women Constables: ग्वाल्हेरमधील टेकनपूर येथे बीएसएफच्या अकादमीमधून एक महिन्यापासून बेपत्ता असलेल्या दोन महिला कॉन्स्टेबलचा शोध अनेक यंत्रणांकडून घेतला जात आहे. आंतरराष्ट्रीय सीमांवर बीएसएफच्या यंत्रणांना सतर्क करण्यात आलं आहे.  

ग्वाल्हेरमधील टेकनपूर येथे बीएसएफच्या अकादमीमधून एक महिन्यापासून बेपत्ता असलेल्या दोन महिला कॉन्स्टेबलचा शोध अनेक यंत्रणांकडून घेतला जात आहे. आंतरराष्ट्रीय सीमांवर बीएसएफच्या यंत्रणांना सतर्क करण्यात आलं आहे.  जबलपूरमध्ये राहणारी आकांक्षा निखार आणि बंगालमधील मुर्शिदाबाद येथे राहणारी शाहना खातून २०२१ पासून अकादमीमध्ये प्रशिक्षक होत्या. ६ जून २०२४ रोजी त्या बेपत्ता झाल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांना दोन्ही कॉन्स्टेबलच्या फोनमध्ये संशयास्पद हालचाली दिसून आल्यानंतर याबाबतच्या तपासाला वेगळं वळण लागलं आहे. तसेच रेकॉर्डमधून त्यांच्या फोनचं लोकेशन हे दिल्ली, हावडा आणि पश्चिम बंगालमधील बेहरामपूर येथे दाखवण्यात आलं होतं. 

या दोन्ही महिला कॉन्स्टेबलचा शोध घेण्यासाठी अधिकारी अनेक ठिकाणांवरून फोन रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेजचा तपास करण्यासह विविध राज्यांमध्ये त्यांनी केलेल्या प्रवासामागच्या कारणांचा तपास केला जात आहे. तसेच दोन्ही कॉन्स्टेबल आणि पश्चिम बंगालमधील शाहना कुटुंबीयांमध्ये काही संबंध आहे की नाही याचाही शोध घेतला जात आहे. ७ जून रोजी बेहरामपूरमधील बीकन रुग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या दिसल्या होत्या. रुग्णालयातून बाहेर पडल्यापासून त्यांचे फोन बंद आहेत. दरम्यान, बेपत्ता असलेस्या कॉन्स्टेबल आकांक्षा निखार यांची आई उर्मिला निखार यांनी ग्वाल्हेर पोलिसांसोबतच्या जनसुनावणीदरम्यान, चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना ५ जून रोजी आकांक्षासोबत झालेल्या संभाषणाची माहिती दिली. तसेच त्यामध्ये ती काहीशी घाबरलेली दिसल्याचं सांगितलं.  

उर्मिला निखार यांनी आरोप केला की, ग्वाल्हेर पोलिसांनी ६ जून रोजी बिलुआ पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. मात्र तपास केला गेला नाही. बंगालमध्ये शहाना हिच्या नातेवाईकांनी निखार हिला कुठलीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील गुढ वाढत आहे. आकांक्षा यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ग्वाल्हेर पोलिसांनी एका विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या महिला कॉन्स्टेबलचा शोध घेण्यासाठी पोलीस अधिकारी बंगालमध्ये आपल्या समकक्षांसह राज्य आणि केंद्रीय यंत्रणांची मदत घेत आहे.  

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलWomenमहिलाIndiaभारत