शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
3
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
4
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
5
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
6
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
7
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
8
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
9
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
10
शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर
11
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
12
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
13
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
14
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
15
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
16
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
17
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
18
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
19
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
20
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार

खळबळजनक! जम्मूमध्ये सीमेजवळ पुन्हा आढळला बोगदा; १० दिवसांतील दुसरी घटना

By देवेश फडके | Updated: January 23, 2021 16:22 IST

जम्मू काश्मीरमधील हीरानगर भागात असलेल्या पानसर येथे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना आणखी एक बोगदा सापडला आहे. गेल्या दहा दिवसांत दुसरा बोगदा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देजम्मूमधील पानसेर येथे पुन्हा आढळला बोगदागेल्या १० दिवसातील दुसऱ्या घटनेने खळबळसीमा सुरक्षा दलाची विशेष शोधमोहीम

जम्मू : जम्मू काश्मीरमधील हीरानगर भागात असलेल्या पानसर येथे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना आणखी एक बोगदा सापडला आहे. गेल्या दहा दिवसांत दुसरा बोगदा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नव्याने आढळलेल्या बोगद्याची लांबी सुमारे १५० मीटर असून, याची निर्मिती भारतात घुसखोरीसाठी करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांकडून या बोगद्याची निर्मिती करण्यात आली होती. याचा वापर दहशतवाद्यांना भारतात घुसखोरीसाठी करण्याची योजना होती, असेही सांगितले जात आहे. यासंदर्भात अधिक तपास केला जात आहे. 

गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका विशेष शोधमोहीम सुरू असून, याअंतर्गत जम्मूमधील पानसेर येथे आणखी एक बोगदा आढळला आहे. बीपी नंबर १४ व १५ दरम्यान हा बोगदा आढळून आला असून, हा बोगदा सुमारे १५० मीटर लांब व ३० फूट खोल आहे, असे लष्करी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

गेल्या सहा महिन्यातील चौथा बोगदा

आतापर्यंत जम्मू परिसरात दहाव्यांदा आणि मागील सहा महिन्यांमध्ये चौथ्यांदा बोगदा आढळून आला आहे. भारतीय जवानांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये याच क्षेत्रातील घुसखोरीचा प्रयत्न  हाणून पाडला होता. सीमा सुरक्षा दलाने जून २०२० मध्ये याच भागात शस्त्र आणि स्फोटके घेऊन जाणारे एक पाकिस्तानी हेक्साकॉप्टरला पाडले होते, असेही लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पाकिस्तानी छावणी केवळ ४०० मीटरवर

गतवर्षीच्या ऑगस्ट महिन्यातही सीमा सुरक्षा दलाला अशाच प्रकारचा एक बोगदा आढळला होता. जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात असलेल्या बेंगालड भागात २५ फूट खोल आणि १५० मीटर लांबीचा बोगदा आढळून आला होता. त्या बोगद्यांपासून पाकिस्तानी लष्कराची चौकी ४०० मीटर अंतरावर होती. तसेच या भूयारी मार्गाबरोबरच शक्करगढ, कराची लिहिलेल्या काही वाळूच्या पिशव्याही तिथं सापडल्या होत्या, असे भारतीय लष्करी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादBSFसीमा सुरक्षा दलPakistanपाकिस्तान