शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिश जोडप्यास बिहारात मारहाण, लुटण्याचाही प्रयत्न; पोलिसांनी केली दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 05:00 IST

बिहारमध्ये पर्यटनासाठी आलेल्या ब्रिटिश जोडप्याशी गैरवर्तणूक करून, त्यांना लुटण्याचा प्रयत्न करणा-या एका टोळीला पोलिसांनी अटक केली.

पाटणा : बिहारमध्ये पर्यटनासाठी आलेल्या ब्रिटिश जोडप्याशी गैरवर्तणूक करून, त्यांना लुटण्याचा प्रयत्न करणा-या एका टोळीला पोलिसांनी अटक केली. हा प्रकार रविवारी घडला. या जोडप्याने तेथून पळ काढला आणि लगेच तक्रार केली, असे पोलिसांनी सांगितले.आम्ही गंगेच्या काठावरील तंबूत असताना दोन जण तिथे आले. त्यांच्या हातात काठ्या व शस्त्रे होती. त्यांनी आमच्याशी गैरवर्तन करून आमच्याकडील चीजवस्तू लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही वेळीच तिथून पळ काढला आणि नदी पार केली, असे या जोडप्याने पोलिसांना सांगितले.तिथे आम्ही पोलिसांची मदत मागितली, असे त्या जोडप्यातील मॅथ्यू याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत, लूटमारीचा प्रयत्न करणाºया दोघांचा दोन तासांत शोध घेतला. पर्यटक वा कोणाही बाबतीत असे घडू नये, यासाठी आम्ही आणखी प्रयत्न करू, असे पोलिसांनी सांगितले. गेल्या आठवड्यात एका स्वीस जोडप्याला उत्तर प्रदेशच्या आग्राजवळील फतेहपूर सिक्री येथे चार जणांनी बेदम मारहाण केली होती. त्यांना दंडुक्याने मारले होते. त्यातील तरुणीच्या हाताचे हाड मोडले असून, तिच्या सहकाºयाला कानाने ऐकू येईनासे झाले आहे.त्यांच्यावर दिल्लीत उपचार करण्यात आले. ते रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत पडले असताना आणि मदतीची विनंती करीत असताना, कोणीही पुढे आले नाही. किंबहुना, अनेक जण मोबाइलवर त्यांचे फोटो काढत होते. या गंभीर प्रकाराची परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दखल घेतली आणि उत्तर प्रदेश सरकारकडून अहवाल मागविला होता. या जोडप्याला मारहाण करणाºया चौघांचा उत्तर प्रदेश पोलीस शोध घेत आहेत. त्यापैकी एकाची ओळख पटली असून, त्याच्या भावाला पोलिसांनी ताब्यातघेतले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक