शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंड पुण्याला जाऊ नये म्हणून विमानात बॉम्ब असल्याची अफवा, ब्रिटीश एअरवेजचा ट्रेनी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 20:17 IST

दिल्ली-पुणे स्पाईसजेट विमानात बॉम्बची खोटी माहिती देणाऱ्या ब्रिटिश एअरवेजच्या प्रशिक्षणार्थीला अटक करण्यात आली आहे.

दिल्ली-पुणे स्पाईसजेट विमानात बॉम्बची खोटी माहिती देणाऱ्या ब्रिटिश एअरवेजच्या प्रशिक्षणार्थीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आरोपीची चौकशी करत आहे. दोन आरोपी अद्याप फरार आहेत. गुरुवारी आरोपींनी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील स्पाइसजेटच्या कॉल सेंटरला फोन करून पुण्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची खोटी माहिती दिली होती.

विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळताच विमानतळावर एकच खळबळ उडाली होती. सुरक्षा यंत्रणांनी अनेक तास शोध मोहीम राबवली. पण फ्लाइटच्या आत काहीच सापडलं नाही. यानंतर दिल्ली पोलिसांनी बनावट कॉल करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी एक विशेष टीम तयार केली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीनं आपल्या मित्राला मदत करण्यासाठी फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची खोटी माहिती दिली.

बॉम्बची अफवा पसरवणाऱ्या आरोपी मित्रांच्या मैत्रिणीला प्रत्यक्षात पुण्याला जायचं होतं, असेही या माहितीत उघड झालं आहे. पण त्याच्या मित्रांना त्यांच्या मैत्रिणींसोबत आणखी काही वेळ घालवायचा होता. यामुळे आरोपींनी मित्रांसोबत प्लॅन बनवला आणि स्पाइसजेटच्या कॉल सेंटरला फोन करून फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची खोटी माहिती दिली.

विमान उड्डाण घेणार, तेव्हाच बॉम्ब असल्याची माहितीगुरुवारी संध्याकाळी ६.३० च्या सुमारास फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली, जेव्हा फ्लाइट टेक ऑफ करणार होतं. बॉम्बची माहिती मिळाल्यानंतर बॉम्बशोधक पथकाला पाचारण करून शोध मोहीम हाती घेण्यात आली. मात्र, चौकशीत काहीही संशयास्पद आढळलं नाही.

मॉस्को-गोवा फ्लाइटमध्येही बॉम्ब असल्याची अफवायापूर्वी सोमवारीही अशीच एक घटना समोर आली होती. मॉस्को-गोवा विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचे गुजरातमधील जामनगर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं. मात्र, विमानाची झडती घेतली असता त्यात काहीही संशयास्पद आढळलं नव्हतं.

टॅग्स :spicejetस्पाइस जेट