शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेलचा अंतर्भात GST मध्ये करणार का?; अनुराग ठाकुर म्हणाले, "यासाठी तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 15:45 IST

Petrol Diesel Price Hike : पेट्रोलचे दर तुर्तास ७५ रुपयांवर न येण्याचे संकेत; पेट्रोल, डिझेलचा अंतर्भाव GST मध्ये झाल्यास दर कमी होण्याची वर्तवण्यात आली होती शक्यता

ठळक मुद्देपेट्रोलचे दर तुर्तास ७५ रुपयांवर न येण्याचे संकेतपेट्रोल, डिझेलचा अंतर्भाव GST मध्ये झाल्यास दर कमी होण्याची वर्तवण्यात आली होती शक्यता

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला आठ मार्चपासून सुरूवात झाली. मंगळवारी या अधिवेशनाचा दुसरा दिवस होता. दरम्यान, दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरावरून विरोधकांनी लोकसभा आणि राज्यसभेत जोरदार विरोध केला. यामुळे संसदेचं कामकाज अनेकदा काही वेळासाठी स्थगित करण्यात आलं. परंतु यानंतरही विरोधकांचा गदारोळ सुरू असल्यामुळे कामकाज बुधवारपर्यंत स्थगित करण्यात आलं. दरम्यान, विरोधकांनी पेट्रोल-डिझेलचा अंतर्भाव जीएसटीच्या का केला जात नाही असा सवाल विरोधकांनी केला. यावर अनुराग ठाकुर यांनी लेखी स्वरूपात उत्तर दिलं. "पेट्रोल आणि डिझेलचा अंतर्भाव जीएसटीमध्ये करण्यासाठी आतापर्यंत कोणतीही शिफारस करण्यात आली नाही. त्याचा अंतर्भाव जीएसटीमध्ये करण्यासाठी जीएसटी परिषदेच्या शिफारसीची आवश्यकता आहें. परंतु आतापर्यंत अशी शिफारस करण्यात आली नाही," अशी माहिती अनुराग ठाकुर यांनी लेखी उत्तराद्वारे दिली. तेलाचं उत्पादन वाढल्यास किमती कमी होतीलकोरोनामुळं विक्रीत घट झाल्यानं तेल उत्पादक देशांनी उत्पादन कमी केलं होतं. पण आता परिस्थिती पूर्वपदावर येत असूनही तेलाचं उत्पादन पूर्वीसारखं रुळावर येऊ शकलेलं नाही. यामुळे एलपीजीच्या विक्रीत वाढ झाली आणि उत्पादन कमी होत असल्यानं किमतीत वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे. 

तेल उत्पादक देशांवर दबावनिर्मितीभारत अनेक देशांकडून तेलाची खरेदी करतो. यात रशिया, कतार आणि कुवैतसह अन्य काही देशांचा समावेश आहे. या देशांवर भारताकडून तेलाचं उत्पादन वाढविण्यासाठीच्या दबावनिर्मितीचं काम केलं जात आहे. तेलाचं उत्पादन वाढलं तर आपोआप कच्च्या तेलाच्या प्रतिबॅरलची किंमत कमी होईल. त्यानंतर किरकोळ बाजारातही तेलाच्या किमतीत घट होईल, असा विश्वास सरकारनं यापूर्वी व्यक्त केला होता. ... तर दर ७५ रूपयांवर येतीलपेट्रोल-डिझेलचा अंतर्भाव ‘जीएसटी’मध्ये केल्यास शंभरी पार पोहोचलेल्या पेट्रोलचे दर ७५ रुपये प्रति लिटरवर सहज आणता येऊ शकतील. परंतु महत्त्वाचा महसुली स्रोत गमावण्याची भीती असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये या संबंधाने राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसून येत असल्याची  टिप्पणी  स्टेट बँकेच्या अर्थविषयक तज्ज्ञांनी आपल्या प्रसिद्ध केलेल्या अहवालात केली होती.

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलGSTजीएसटीAnurag Thakurअनुराग ठाकुरParliamentसंसदRajya Sabhaराज्यसभा