शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
4
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
5
अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
6
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
7
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
8
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
9
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
10
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
11
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
12
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
13
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
14
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
15
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
16
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
17
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
18
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
19
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
20
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलांच्या इंटरनेट वापरावर ऑस्ट्रेलियासारखा कायदा आणावा; मद्रास हायकोर्टाचे केंद्र सरकारला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 16:16 IST

इंटरनेटमुळे अश्लील, आक्षेपार्ह सामग्री मुलांच्या हाती

डॉ. खुशालचंद बाहेती -

चेन्नई : अल्पवयीन मुलांच्या इंटरनेट वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियातील कायद्याप्रमाणे स्वतंत्र कायदा करण्याचा विचार करावा, असे सूचक निर्देश मद्रास हायकोर्टाचे न्यायमूर्ती जी. जयचंद्रन आणि के. के. रामकृष्णन यांनी केंद्र सरकारला दिले आहेत. इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे अश्लील व आक्षेपार्ह सामग्री मुलांच्या आवाक्यात मोठ्या प्रमाणात येत आहे, असे हायकोर्टाने म्हटले आहे. 

एस. विजयकुमार यांनी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग आणि तामिळनाडू बालहक्क आयोगाविरुद्ध जनहित याचिका दाखल केली होती. यात इंटरनेट सेवा प्रदात्यांना ‘पालक विंडो’ सेवा लागू करण्यास भाग पाडावे.  याचे पालन न करणाऱ्यांवर  खटले चालवावेत, अशी मागणी केली. केंद्र सरकारने मार्च २०१७ मध्ये ‘पालक विंडो’ सेवा देण्याची सूचना यापूर्वी दिली आहे; पण याची अंमलबजावणी झाली नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. 

हायकोर्टाने म्हटले की, देशातील या विषयाशी संबंधित संस्थांनी आपली कर्तव्ये समाधानकारक रीतीने पार पाडल्याचे कोणतेही ठोस चित्र समोर येत नाही. शाळांमध्ये काही प्रमाणात जनजागृती कार्यक्रम होत असले तरी, मुलांवर ऑनलाइन अश्लील सामग्रीचा वाढता व गंभीर परिणाम लक्षात घेता ते अत्यंत अपुरे आहेत. 

ऑस्ट्रेलियातील कायदा असा...१६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाते उघडण्यास बंदी. अश्लील किंवा प्रौढांसाठीच्या वेबसाइटवर  वापरकर्त्यांचे वय पडताळून घेणे बंधनकारक. अल्पवयीन मुलांसाठी इंटरनेट प्रवेश करताना पडताळणीचे कडक कायदे. 

ऑनलाइन सामग्रीवर फिल्टरवेबसाइट्स आणि ऑनलाइन सामग्रीवर फिल्टर लावते किंवा ती पूर्णपणे बंद करते. अल्पवयीन मुलाला मोबाइल, कॉम्प्युटर, इत्यादी किती वेळ आणि कोणत्या वेळेत वापरता येईल, यावर मर्यादा आणते. ॲप्स, खेळ गेम्स इन्स्टॉल किंवा सुरू करता येतील, यावर वयोमर्यादेनुसार नियंत्रण ठेवते.मुलाने कोणत्या वेबसाइट्स पाहिल्या, ॲप्स वापरली, शोधशब्दांचा वापर केला याचे अहवाल पालकांना उपलब्ध करून देते.

काय म्हणाले हायकोर्ट? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा संदर्भ देत हायकोर्ट म्हणाले, ऑनलाइन जगतातील बालसंरक्षणासाठी घटनात्मक तरतुदी पुरेशा नसून नियामक संस्था, सेवाप्रदाते, अन्य संबंधित घटकांनी सतत व सक्रिय पद्धतीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. इंटरनेट सेवाप्रदात्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या गेलेल्या अश्लील, आक्षेपार्ह लिंकवर तत्काळ बंदी घालण्याचे आश्वासन दिल्याची नोंदही न्यायालयाने घेतली. ॲास्ट्रेलियासारखे कायदे भारतातही करण्याचा विचार करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Madras HC urges law like Australia for child internet safety.

Web Summary : Madras High Court directs the central government to consider enacting a law similar to Australia's to regulate minors' internet use, citing concerns about access to inappropriate content. The court was hearing a petition regarding the implementation of 'parental window' services by internet providers.
टॅग्स :Courtन्यायालयGovernmentसरकार