शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मतदानास येताना जनावरेही आणा! मतदान वाढण्यासाठी अनेक फंडे

By यदू जोशी | Updated: November 26, 2022 13:05 IST

जुनागडच्या जिल्हा प्रशासनाने त्यांच्याकडील मतदानात मोठी वाढ व्हावी यासाठी ही शक्कल शोधली आहे. गाय, म्हशींपासून कुत्रे, मांजरांनादेखील तुम्ही मतदान केंद्रांवर नेऊ शकता. केंद्रापासून जवळच पाळीव प्राण्यांची आरोग्य तपासणी केंद्रे उभारली जाणार आहेत.

यदु जोशी

गांधीनगर : मतदानाला येताना तुमच्याकडील पाळीव प्राणी घेऊन या, तुम्ही मतदान करत असताना त्यांची तिकडे मोफत आरोग्य तपासणी केली जाईल; गरज वाटली तर उपचारदेखील केले जातील. असे एक ना अनेक फंडे सध्या गुजरातमध्ये मतदानाचा टक्का वाढण्यासाठी वापरले जात आहेत.

जुनागडच्या जिल्हा प्रशासनाने त्यांच्याकडील मतदानात मोठी वाढ व्हावी यासाठी ही शक्कल शोधली आहे. गाय, म्हशींपासून कुत्रे, मांजरांनादेखील तुम्ही मतदान केंद्रांवर नेऊ शकता. केंद्रापासून जवळच पाळीव प्राण्यांची आरोग्य तपासणी केंद्रे उभारली जाणार आहेत.

मुख्य निवडणूक अधिकारी पी. भारती यांनी ‘अवसर’ म्हणजे ऑल व्होटर्स स्पिरिटेड, अवेअर अँड रिस्पॉन्सिबल’ अशी एक मोहीम हाती घेतली. गांधीनगरमधील त्यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली असता त्यांनी याबाबत माहिती दिली. २०१७ मध्ये गुजरातमध्ये ६९ टक्के मतदान झाले, ते वाढावे हे ध्येय समोर ठेवले. 

‘त्यांच्या’ मतदानाला  सुरुवात८० वर्षे वयांवरील वृद्ध महिला-पुरुष आणि बहुविकलांग यांच्या मतदानाला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. निवडणूक यंत्रणा त्यांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान करवून घेत आहे. प्रत्येक  उमेदवाराचे प्रतिनिधी, पोलीस, व्हिडीओग्राफर यांच्या उपस्थितीत हे मतदान करविले जाते.

बिलात सवलत मिळवाअमूल हा गुजरातमधील दुधाचा सर्वांत मोठा ब्रँड. अमूलच्या प्रत्येक दूध पिशवीवर मतदानाचे आवाहन करणारा मजकूर आहे. औषध विक्रेते दुकानदार, हॉटेलवाले बिलांवर तसे आवाहन करणारा मजकूर छापतात. ‘मतदान करा, बिलात सवलत मिळवा’ असा फंडाही काहींनी काढला आहे.

गुजरातमध्ये अभूतपूर्व मतदान व्हावे यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. याला भरभरून प्रतिसाद मिळेल, हा विश्वास आहे.- पी. भारती, मुख्य निवडणूक अधिकारी, गुजरात.

जाओ उन की साइन लेकर आओ... -- राज्यातील ९३ लाख शालेय विद्यार्थ्यांना ‘आम्ही सर्व कुटुंबीय मतदान करणार’ असा मथळा असलेली शपथपत्रे देण्यात आली. - ती त्यांनी पालकांकडून भरून आणायची होती. ८४ लाख जणांनी ही शपथपत्रे भरून आणली.

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022GujaratगुजरातElectionनिवडणूक