शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: १२ दिवसांचा संसार, लग्नाच्या जोड्यातच वधुवर अंत्यसंस्कार; नवरा देतोय जीवन-मृत्यूची झुंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 19:39 IST

ज्या घरात आनंदी वातावरण होतं तिथेच दु:ख पसरलं. यूपीच्या लखीमपूर येथे कोरोनानं नुकतेच लग्न झालेल्या दाम्पत्यावर संकट कोसळलं

ठळक मुद्देलग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरा आणि बायको दोघांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.रुबीला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. जिथं १२ व्या दिवशी तिने जीव सोडला.सासरी पोहचल्यानंतर रूबीला अतिताप आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

लखीमपूर  - कोरोना काळात अनेकांनी स्वत:च्या जवळची माणसं गमावली. दुसऱ्या लाटेने देशभरात हाहाकार माजला आहे. हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. एक अशीच घटना आम्ही तुम्हाला सांगतोय जी ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. एक नव दाम्पत्य..ज्यांचा संसार फुललाही नव्हता तेवढ्यात कोरोना काळ म्हणून त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. अवघ्या १२ दिवसांत या दाम्पत्याचा संसार अर्ध्यावरच मोडला.

ज्या घरात आनंदी वातावरण होतं तिथेच दु:ख पसरलं. यूपीच्या लखीमपूर येथे कोरोनानं नुकतेच लग्न झालेल्या दाम्पत्यावर संकट कोसळलं आहे. ३० एप्रिल रोजी शोभित आणि रुबी यांचे लग्न झाले. परंतु लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरा आणि बायको दोघांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. रुबीला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. जिथं १२ व्या दिवशी तिने जीव सोडला. लग्नाच्या जोड्यातच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर नवऱ्याची अवस्था अद्यापही गंभीर आहे.

१० दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या रूबीचं ईशवारा गावातील महेंद्र कटियार यांचा मुलगा शोभितसोबत ३० एप्रिल रोजी वाजत गाजत लग्न झालं. १ मे रोजी शोभितने रूबीला घरी आणलं. सासरी पोहचल्यानंतर रूबीला अतिताप आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर शोभित आणि त्याच्या घरच्यांनी रूबीला जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. १० दिवस हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी लढणाऱ्या रूबीने जगाचा अखेर निरोप घेतला. आता नवरा शोभितचाही जीवन आणि मृत्यूमधला संघर्ष सुरू आहे. त्याची अवस्थाही गंभीर आहे.    

पत्नीची काळजी घेता घेता पतीही पडला आजारी

सांगितलं जातं की, रूबीला औषध आणि ऑक्सिजन वेळेवर न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला. नव्या वधुचा घर संसार फुलण्याआधीच सगळं संपलं. शोभितचीही अवस्था गंभीर आहे. रूबी आजारी पडल्यापासून शोभितने हॉस्पिटलमधून पाय काढला नाही. दिवसरात्र तिच्या सेवेसाठी तो राहिला. त्यामुळे त्यालाही ताप आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. स्वत:ची काळजी न घेतल्याने शोभितही आजारी पडला.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या