शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सिनेस्टाइल थरार, बाइकवरून प्रियकराने फेकली वरमाळा थेट नवरीच्या गळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 13:25 IST

24 वर्षीय तरुणीचं लग्न होतं. ते लग्न थांबविण्यासाठी तिचा प्रियकर बाइकवरून आला होता.

पाटणा- प्रेयसीचं लग्न दुसऱ्याच कोणाशी असताना ते लग्न थांबविण्यासाठी आलेला प्रियकर व त्यावरून होणाऱ्या पुढील गोष्टी आपण नेहमीच सिनेमात बघतो. सिनेमात या गोष्टी घडतात तेव्हा बघताना चांगल्या वाटतात. पण खऱ्याखुऱ्या आयुष्यात असं काही घडेल याचा आपण विचारही करत नाही. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. 

india Times ने दिलेल्या वृत्तानुसार,  एका 24 वर्षीय तरुणीचं लग्न होतं. ते लग्न थांबविण्यासाठी तिचा प्रियकर बाइकवरून आला होता. मंडपात नवरी-नवरदेव बसलेले असताना बाइकवरून आलेल्या तिच्या प्रियकराने बाइकवरूनच वरमाळा प्रेयसीकडे भिरकावली. विशेष म्हणजे ती फुलांची माळ बरोबर तिच्याच गळ्यात पडली. प्रियकराने गळ्यात वरमाळा टाकल्यावर मंडपात असलेल्या वधुने म्हणजेच त्या मुलाच्या प्रेयसीनेही त्याला वरमाळा घातली. दिग्दर्शक करण जोहर किंवा यश चोप्रा यांच्या सिनेमात दिसावी अशी घटना बिजनोरमधील नगीनामध्ये घडली. दोघांनी एकमेकांना वरमाळा घातल्याने चिडलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाला चांगलाच चोप दिला. पण नंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मुलाला वाचविलं. 

या घटनेनंतर तरुणीचं ज्या मुलाशी लग्न जमलं होतं त्याच्या कुटुंबीयांनी लग्न मोडलं व रागात तेथून निघून गेले. पोलिसांच्या माहितीनुसार, तरूणी व तिचा प्रियकर कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते. त्यांच्या प्रेमसंबंधाला घरच्यांचा विरोध होता. विविध जातीचे असल्याने घरच्यांनी त्यांच्या नात्याला कडाडून विरोध केला.