शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विटांच्या भिंती, सोन्या-चांदीच्या वस्तू अन्...; PM मोदींच्या गावात मिळाले 2800 वर्ष जुन्या मानवी वस्तीचे पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 11:51 IST

येथून इतिहासासंदर्भात अनेक नव्या गोष्टी समोर येऊ शकतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुळ गाव असलेल्या वडनगरची सध्या ससंपूर्ण देशात चर्चा सुरू आहे. येथे 2800 वर्षांपूर्वीच्या मानवी वस्तीचे पुरावे मिळाले आहेत. येथे विटांच्या भिंती आणि पक्क्या नाल्या दिसून आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे तीन हजार वर्ष होऊनही येथील भिंतीं पूर्णपणे नष्ट झालेल्या नाहीत. येथून इतिहासासंदर्भात अनेक नव्या गोष्टी समोर येऊ शकतात. 

आयआयटी खरगपूर, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, भौतिक संशोधन प्रयोगशाळा, जेएनयू आणि डेक्कन कॉलेजच्या संशोधकांनी हे अवशेष शोधून काढले आहेत. IIT खरगपूरने एका निवेदनात म्हटले आहे की, वडनगरमध्ये सखोल पुरातत्विय उत्खननाच्या अध्ययनातून समोर आले आहे की, 3,000 वर्षांच्या कालावधीत विविध साम्राज्यांचा उदय, अस्त आणि मध्यआशियातून आलेल्या हल्ले खोरांचे भारतावरील वारंवार होणारी आक्रमने, पाऊस अथवा दुष्काळ यासारखे हवामानातील गंभीर बदल झाले.

खोदकामात काय काय आढळलं? -वडनगर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मूळ गाव आहे. महत्वाचे म्हणज, हे बहू धार्मिक आणि  बहू सांस्कृतिक (बौद्ध, हिंदू, जैन आणि इस्लाम) केंद्र राहिलेले आहे. यासंदर्भात बोलताना एएसआय पुरातत्वशास्त्रज्ञ अभिजीत आंबेकर म्हणाले, ‘या खोद कामात, मौर्य, इंडो-ग्रीक, शक-क्षत्रप, हिंदू-सोलंकी, सल्तनत-मुगल (इस्लामिक)  गायकवाड-ब्रिटिश वसाहतवादी राजवटीच्या अस्तित्वासंदर्भात माहिती मिळाली आहे. आमच्या या खोदकामात सर्वात जुना बौद्ध मठही सापडला आहे.’ 

ग्रीक राज्यांच्या नाण्यांचे साचेही आढळले - आंबेकर म्हणाले, ‘आम्हाला विशिष्ट पुरातत्व कलाकृती, मातीची भांडी, तांब्याच्या, सोन्याच्या, चांदीच्या आणि लोखंडाच्या वस्तू आणि महीन डिझाइनच्या बांगड्या सापडल्या आहेत. याशिवाय, इंडो-ग्रीक शासन काळातील ग्रीक राजा अपोलोडेटसच्या नाण्याचे साचेही सापडले आहेत.’ महत्वाचे म्हणजे, प्राचीन इतिहासापासून मध्ययुगीन काळापर्यंत अचूक कालगणनेसह पुरातत्वशास्त्राची अशी अखंड नोंद वडनगरशिवाय भारतात इतर कोठेही आढळत नाही. या दृष्टीनेही वडनगर वेगळे आहे, असेही आंबेकर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :GujaratगुजरातNarendra Modiनरेंद्र मोदी