नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी(दि.10) सायंकाळी भीषण स्फोट झाला. ही घटना लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ घडली. एका कारमध्ये स्फोट झाला, ज्यानंतर शेजारी उभ्या अनेक गाड्याही जळून खाक झाल्या. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत 8 ते 9 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. स्फोटाच्या वेळी परिसरात मोठी गर्दी होती. पोलिसांनी तात्काळ परिसर रिकामा करुन लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या आसपास सुरक्षा वाढवली आहे. NIA आणि NSG कमांडोदेखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.
स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट
स्फोटाचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही, मात्र कारमधील CNG सिलिंडरमुळे स्फोट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र पोलिसांनी याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी केलेली नाही. दुसरी शक्यता अशीही मांडली जात आहे की, कारमध्ये विस्फोटक पदार्थ असू शकतो. दिल्ली पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला असून, बॉम्ब स्क्वॉड आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी तपास करत आहेत.
संशयाची सुई फरीदाबाद घटनेकडे
आजच पोलिसांनी मोठी कारवाई करत एका मोठ्या दहशतवादी कटाचा खुलासा केला आहे. या कारवाईत फरीदाबादमध्ये तब्बल 2900 किलो अमोनियम नायट्रेट सापडले आहे. हे रसायन सामान्यतः स्फोटक तयार करण्यासाठी वापरले जाते. त्या घटनेचा दिल्ली स्फोटाची संबंध आहे का, हे अद्याप समोर आले नाही. पोलिसांच्या तपासानंतरच सत्य समोर येईल. सध्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
Web Summary : A major blast occurred near Delhi's Red Fort around 7 PM today. A car exploded near Red Fort Metro Station Gate 1, igniting a fire that engulfed three other vehicles. The cause of the explosion remains unclear. Further details are awaited.
Web Summary : दिल्ली में लाल किले के पास आज शाम करीब 7 बजे एक बड़ा धमाका हुआ। लाल किला मेट्रो स्टेशन गेट 1 के बाहर एक कार में विस्फोट हो गया, जिससे आग लग गई और तीन अन्य वाहन जल गए। विस्फोट का कारण अज्ञात है। विस्तृत जानकारी जल्द ही।