शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

मोठी बातमी! मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांचा राजीनामा, अरविंद केंजरीवालांनी केला मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 18:17 IST

​​​​​​Breaking Delhi ministers Manish Sisodia and Satyendar Jain Resign from their posts CM Arvind Kejriwal accepts their resignation : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना रविवारी संध्याकाळी सीबीआयकडून कथित मद्य घोटाळ्यात अटक करण्यात आली होती.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना रविवारी संध्याकाळी सीबीआयकडून कथित मद्य घोटाळ्यात अटक करण्यात आली. अटकेपूर्वी सीबीआयने सिसोदिया  Manish Sisodia यांची सुमारे ८ तास चौकशी केली होती. या अटकेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया पूर्णपणे निर्दोष असल्याचे म्हटले होते. दरम्यान, यानंतर मंगळवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि तुरुंगात असलेल्या Satyendar Jain सत्येंद्र जैन यांनी आपला राजीनामा दिला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा राजीनामा मजूर केला आहे.

सिसोदिया हे दिल्लीचे उपमुख्यमंत्री तसेच शिक्षण मंत्री होते. याशिवाय अबकारी खातेही त्यांच्याकडे होते. सिसोदिया यांच्याकडे दिल्ली सरकारचे एकूण ८ विभाग होते. त्यांना ४ मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे अटकेनंतर तब्बल ९ महिन्यांनी सत्येंद्र जैन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.सीबीआय कोठडीत रवानगीमद्य घोटाळा प्रकरणी दिल्ली न्यायालयाने उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना ५ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली होती. आता रद्द करण्यात आलेले अबकारी धोरण २०२१-२२ च्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये कथित भ्रष्टाचार केल्याप्रकरणी न्यायालयाने रविवारी सिसोदिया यांना अटक केली होती. मनीष सिसोदिया यांच्या सीबीआयच्या कोठडीच्या मागणीवरील निर्णय राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने राखून ठेवला होता. 

तत्पूर्वी, न्यायालयाने मंगळवारी कथित दारू घोटाळ्याप्रकरणी सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर विचार करण्यास नकार दिला. सिसोदिया सध्या सीबीआयच्या ताब्यात आहेत. "आम्ही सध्याच्या परिस्थितीत कलम ३२ अंतर्गत याचिका विचारात घेण्यास इच्छुक नाही," असं मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने सिसोदिया यांच्या याचिकेवर म्हटल.

टॅग्स :Manish Sisodiaमनीष सिसोदियाArvind Kejriwalअरविंद केजरीवाल