जंक्शन बारमध्ये तोडफोड
By admin | Updated: July 12, 2015 23:56 IST
तलवारीचा धाक : मॅनेजरला धमकी
जंक्शन बारमध्ये तोडफोड
तलवारीचा धाक : मॅनेजरला धमकीनागपूर : शनिवारी रात्री ७.४५ ला नंदनवनमधील जंक्शन बारमध्ये गुंडांनी तलवारीच्या धाकावर गोंधळ घातला. तोडफोड करीत बार व्यवस्थापकाला खंडणी मागून धमकी दिली.प्रजापती चौकात असलेल्या जंक्शन बारमध्ये आरोपी मिथून नामदेव फुकट, योगेश मोरेश्वर पवार, संदीप रामभाऊ ठाकरे आणि मयूर गंगाधर ठवरे हे चौघे शनिवारी रात्री दारू पीत होते. बाहेर निघताना त्यांनी पैसे दिले नाही. त्यामुळे काऊंटरवर बसलेले डॅनी उर्फ दानेंद्र कृष्णाजी खोब्रागडे (वय ३४) यांनी आरोपींना हटकले. त्यावरून या गुंडांनी तलवार काढून काऊंटरवर तोडफोड केली. ग्लास आणि दारूच्या बाटल्या फोडत खंडणीची मागणी केली. जीवे मारण्याची धमकीही दिली. खोब्रागडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.---- बांधकामस्थळी पडून वृद्धाचा मृत्यू नागपूर : घराचे बांधकाम करताना खाली पडून गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा अखेर मृत्यू झाला. मनसाराम किसन बागडे (वय ७०, रा. तांडापेठ) असे त्यांचे नाव आहे. ते गवंडी काम करायचे. बैरागीपुरा, मेहंदीबाग पुलाजवळ घर बांधण्याचे काम करीत असताना ५ जुलैला दुपारी ३ वाजता तोल जाऊन ते खाली पडले. गंभीर जखमी झालेल्या बागडेंना उपचाराकरिता मेयोत दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान शनिवारी दुपारी १ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पाचपावली पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे. ----