नवी दिल्ली : जागतिक बाजारातील मजबूत स्थितीच्या पाश्र्वभूमीवर आभूषण विक्रेते व किरकोळ विक्रेते यांच्या मागणीने उठाव धरल्याने राजधानी दिल्लीच्या बाजारात सोन्याचा भाव 40 रुपयांनी वधारून 27,49क् रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. मंगळवारी सोन्याच्या भावात किरकोळ सुधारणा झाल्याने तीन दिवसांच्या घसरणीला लगाम बसला.
औद्योगिक संस्थांची मागणी वधारल्याने चांदीचा भाव 5क् रुपयांच्या तेजीसह 38,25क् रुपये प्रतिकिलो झाला.
बाजारातील सूत्रंनी सांगितले की, आभूषण विक्रेते व किरकोळ विक्रेत्यांनी सध्याच्या खालच्या पातळीवर मागणी केल्याने या मौल्यवान धातूंच्या भावात वाढ दिसून आली. याशिवाय अमेरिकी फेडरल रिझव्र्हच्या धोरणात्मक बैठकीपूर्वी गुंतवणूकदारांच्या मागणीत वाढ झाल्याने जागतिक बाजारात सोन्याच्या भावात सुधारणा झाली. याचा स्थानिक बाजार धारणोवर सकारात्मक परिणाम दिसून आला.
चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी 66,क्क्क् रुपये व विक्रीकरिता 67,क्क्क् रुपये प्रतिशेकडय़ावर बंद झाला.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
4स्थानिक बाजाराचा कल निश्चित करणा:या सिंगापूर बाजारात सोन्याचा भाव क्.5 टक्क्यांच्या तेजीसह 17.21 डॉलर प्रतिऔंस झाला. चांदीचा भावही क्.4 टक्क्यांनी वधारून 17.21 डॉलर प्रतिऔंसवर राहिला.
4दिल्लीत 99.9 व 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 4क् रुपयांनी वाढून अनुक्रमे 27,49क् व 27,29क् रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.
4 गेल्या तीन सत्रंत सोन्याच्या भावात 475 रुपयांची घट झाली होती. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव 24,क्क्क् रुपयांवर कायम राहिला.