शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

केदारनाथ मंदिरात सोन्याऐवजी पितळ?, १२५ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 06:28 IST

सोन्याचा मुलामा देण्याच्या नावाखाली १२५ कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून, त्याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

केदारनाथ : उत्तराखंडमधील केदारनाथ या प्रसिद्ध मंदिरातील गाभाऱ्यात सोन्याऐवजी पितळी मुलामा देण्यात आल्याचा आरोप चारधाम महापंचायतचे उपाध्यक्ष व केदारनाथ मंदिराचे पुजारी आचार्य संतोष त्रिवेदी यांनी एका व्हिडीओद्वारे केला आहे.

सोन्याचा मुलामा देण्याच्या नावाखाली १२५ कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून, त्याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्रिवेदी यांचे आरोप बिनबुडाचे आहेत, असे बद्री-केदार मंदिर समितीने म्हटले आहे.

या समितीने म्हटले आहे की, केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात सोन्याचा मुलामा देण्यात यावा, अशी एका भाविकाची इच्छा होती. त्यानुसार कृती करण्याचा निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. 

पुरातत्त्व खात्याच्या देखरेखीखाली या भाविकाच्या सराफामार्फत सोन्याच्या मुलाम्याचे काम पूर्ण करण्यात आले होते. मात्र, सोने हे धनदौलतीचे प्रतीक आहे. त्यामुळे त्याचा मुलामा केदारनाथ मंदिरातील गाभाऱ्यात देणे योग्य होणार नाही, अशी भूमिका पुजाऱ्यांनी घेतली होती. सोन्याच्या मुलाम्याबाबत राजकीय हेतूंनी प्रेरित होऊन आरोप केले जात असल्याचा दावा बद्री-केदार मंदिर समितीने केला आहे. (वृत्तसंस्था)

सोन्याची नीट तपासणी झाली नव्हती?आचार्य संतोष त्रिवेदी यांनी असा दावा केला की, केदारनाथ मंदिरातील गाभाऱ्यात मुलाम्याचे काम करण्याआधी सोन्याची नीट तपासणी झाली नव्हती. त्यामुळे या प्रकरणी झालेल्या घोटाळ्याबाबत बद्री-केदार मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. 

उच्चस्तरीय चौकशी हवी केदारनाथ मंदिरातील सोन्याच्या मुलामाप्रकरणी झालेले आरोप गंभीर असून, हे फौजदारी गुन्ह्याचे प्रकरण आहे. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे.    - अखिलेश यादव,    माजी मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश 

टॅग्स :Kedarnathकेदारनाथ