शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र तिप्पट वेगवान होणार, आवाजाच्या सातपट वेगाने मारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 5:40 AM

‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र येत्या ७ ते १० वर्षात आवाजापेक्षा सातपट अधिक अर्थात ‘मॅक ७’ इतक्या वेगाने मारा करू शकणार आहे

मुंबई : ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र येत्या ७ ते १० वर्षात आवाजापेक्षा सातपट अधिक अर्थात ‘मॅक ७’ इतक्या वेगाने मारा करू शकणार आहे. सध्या ‘मॅक २.८’ वेगाने मारा करणारे हे क्षेपणास्त्र टप्प्याटप्प्याने वेग वाढवून सध्याच्या ‘सुपरसॉनिक’वरून अधिक वरच्या ‘हायपरसॉनिक’ श्रेणीत नेण्यात येईल, असे ‘ब्रह्मोस एअरोस्पेस‘ मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुधीर मिश्रा यांनी सांगितले.‘देशाच्या नवीन अर्थव्यवस्थेत तंत्रज्ञानाचे स्थान’ या विषयावरील चर्चासत्रासाठी सुधीर मिश्रा मुंबई शेअर बाजारात आले होते. त्यावेळी त्यांनी ‘ब्रह्मोस‘बाबत माहिती दिली. ब्रह्मोस एअरोस्पेस ही भारत व रशिया यांची संयुक्त कंपनी आहे. भारतातील ब्रह्मपुत्रा व रशियातील मस्क्वा या नद्यांच्या नावांची अद्याक्षरे घेऊन या क्षेपणास्त्राचे नामकरण करण्यात आले आहे. या कंपनीमध्ये भारताच्या डीआरडीओची भागिदारी ५५ टक्के आहे.मिश्रा यांनी सांगितले की, ब्रह्मोस क्षेपणास्त्र सध्या सुपरसॉनिक वेगाने मारा करते. लवकरच या क्षेपणास्त्राचा वेग मॅक ३.५ पर्यंत वाढवला जाईल. त्यानंतर पुढील तीन वर्षात तो मॅक ५ वर नेला जाईल. पुढील पिढीतील क्षेपणास्त्र होण्यासाठी हा वेग मॅक ७ पर्यंत वाढवणे गरजेचे असेल. त्यासाठी आम्ही १० वर्षापर्यंतचा कालावधी निश्चित केला आहे. या कालावधित हे क्षेपणास्त्र हायपरसॉनिक श्रेणीत नेले जाईल. हे लक्ष्य गाठण्यासाठी डीआरडीओसह आयआयटी व इन्स्टिट्यूट आॅफ सायन्समधील तज्ज्ञ कार्यरत आहेत.कुठल्याही क्षेपणास्त्राचा कालावधी हा अधिकाधिक २५ ते ३० वर्षे असतो. त्यानंतर नवीन तंत्रज्ञानामुळे ते क्षेपणास्त्र कालबाह्य ठरते. सध्याची सर्व क्षेपणास्त्रे गतीमानतेवर आधारित तंत्रज्ञानाने सज्ज आहेत. पण पुढील काळातील क्षेपणास्त्रे उच्च क्षमतेच्या लेझर तंत्रज्ञानाने सज्ज असतील. तरीही सध्या ब्रह्मोस हे जगातील सर्वाधिक वेगवान क्षेपणास्त्र आहे. अमेरिकेकडेही असे क्षेपणास्त्र नाही. या क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी ७० टक्के सुटे भाग खासगी कंपन्यांकडून खरेदी केले जात आहेत, असेही मिश्रा यांनी स्पष्ट केले. 

चारच देशांकडे तंत्रज्ञान - आवाजाच्या दुप्पट ते तिप्पट वेगाने मारा करणारी सुपरसोनिक क्षेपणास्त्रे अनेक देशांकडे आहेत. पण आवाजापेक्षा चारपट किंवा त्याहून अधिक वेगाने मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान जगात फक्त चार देशांकडे आहे. अमेरिका या तंत्रज्ञानावर सध्या काम करीत आहे. याखेरीज दोन प्रकारची क्षेपणास्त्रे रशिया स्वतंत्रपणे विकसित करीत आहे. रशिया आणि चीन संयुक्तपणे दोन प्रकारची क्षेपणास्त्रे निर्मित करीत आहे. त्यानंतर भारत-रशिया यावर काम करीत आहे.

मारक क्षमताही वाढणार : भारत अलिकडेच क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण देशांच्या गटाच्या (एमटीसीआर) निर्बंधांतून बाहेर पडला. त्यामुळे सुपरसोनिक वेगाच्या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ३०० किमीच्यावर नेण्यावरील बंधनातून भारताची मुक्तता झाली आहे. यामुळेच सध्याच्या ब्रह्मोसची मारक क्षमता ४५० किमीवर नेली जात आहे. त्यानंतर हायपरसोनिक (मॅक ७) श्रेणीतील ब्रह्मोसची मारक क्षमता ७०० किमीपर्यंत राहण्याची शक्यता आहे.