शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक सलोख्याचं दर्शन; मशिदीसाठी ब्राह्मणांकडून जमिनीचं दान, शिखांनीही उभारला निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 14:08 IST

मशिदीच्या बांधकामासाठी स्थानिक ब्राम्हणांनी आपली जमीन देत सर्वांसमोर हिंदू - मुस्लिम एकतेचं उदाहरण ठेवलं आहे

बरनाला - पंजाबमधील बरनाला जिल्ह्यात धार्मिक एकतेचं उदाहरण पहायला मिळालं आहे. मशिदीच्या बांधकामासाठी स्थानिक ब्राम्हणांनी आपली जमीन देत सर्वांसमोर हिंदू - मुस्लिम एकतेचं उदाहरण ठेवलं आहे. मूम गावातील ही घटना आहे. इतकंच नाही तर मशिदीच्या बांधकामासाठी लागणारा निधी शिखांनी गोळा करुन दिला. मशिद उभारण्यासाठी इतर दोन धर्मातील लोकांनीही पुढाकार घेतला आहे. 

लुधियाना जिल्ह्याला लागून असणा-या गावात या मशिदीचं काम सुरु असून जसवीर खान यांचा भाऊ नजीम खान याच्यावर देखभालीची जबाबदारी आहे. त्यांनी सांगितलं आहे की, 'आम्ही गावात आतापर्यंत दोन खोल्यांच्या बाबा मोमीन शाह यांच्या दर्ग्यात नमाज पठण करायचो. गावातील ब्राम्हणांनी आम्हाला जमीन दान केली, ज्यानंतर आम्ही बांधकाम सुरु केलं. त्यांनी फक्त जमीनच दिली नाही तर बांधकामासाठी आम्हाला मदतही करत आहेत. त्यांनी आमच्यासाठी निधीही गोळा करत आहेत'.

शीख समाजाचाही पुढाकारनजीम खान सांगतात की, 'ज्याप्रकारे गावातील लोक आणि आमचे शीख बंधू मशिद उभारण्यासाठी आम्हाला मदत करत आहेत ते पाहता लवकरच काम पूर्ण होईल'.

एकाच गावात मंदिर, मशिद आणि गुरुद्वारामशिदीच्या बांधकामात महत्वाची भूमिका निभावणारे आणि आयुर्वेदाशी संबंधित व्यवसायाशी जोडले गेलेले पंडित पुरुषोत्तम लाल यांनी आम्ही आपलं कर्तव्य निभावलं असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 'आम्ही गावात एक शिवमंदिर उभं करत आहोत. आमच्या गावात गुरुद्वाराही आहे. त्यामुळे गावात एक मशिद असावी अशी आमची इच्छा होती. सर्व धर्मांचा योग्य आदर राखला गेला पाहिजे असं आम्हाला वाटतं. लहानपणापासून आम्हाला सर्वांचा सन्मान करण्याची शिकवण मिळाली आहे. धर्मनिरपेक्ष असल्याचा आम्हाला गर्व आहे'. 

या गावात जवळपास शीख समाजाची लोकसंख्या चार हजार आहे. तर मुस्लिम आणि हिंदूंची लोकसंख्या 400 च्या आसपास आहे. हे गाव सामाजिक एकतेचं उदाहरण असल्याचं सरपंच मनजीत कौर सांगतात.