शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 15:48 IST

संबंधित आरोपी 25 फेब्रुवारीपासून जेलमध्ये बंद असल्याने, त्याच्या विरोधात इतर कुठला जुना  गुन्हेगारी खटला नसल्याने, आरोपांची प्रवृत्ती आणि तुरुंगात गर्दी असल्याने आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला.

लग्नाचे खोटे आमिष दाखवून महिलेचे शारीरिक शोषण केल्याच्या एका प्रकरणात न्यायालयाने लिव्ह-इन रिलेशनशिपचा उल्लेख केला आहे. लिव्ह-इन रिलेशनशिप ही संकल्पना मध्यमवर्गीय समाजाच्या स्थापित कायद्यांच्या विरुद्ध असल्याचे म्हणत, अशा प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने न्यायालयाने चिंताही व्यक्त केली आहे.

उच्च न्यायालयाचे  जस्टिस सिद्धार्थ हे या प्रकरणाची सुनावणी करत होते. त्यांच्या समोर शान ए आलमचा जामीन अर्ज आला होता. संबंधित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्याच्या अनेक तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवत त्याने मुलीशी शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला, असा आरोप आहे.

संबंधित आरोपी 25 फेब्रुवारीपासून जेलमध्ये बंद असल्याने, त्याच्या विरोधात इतर कुठला जुना  गुन्हेगारी खटला नसल्याने, आरोपांची प्रवृत्ती आणि तुरुंगात गर्दी असल्याने आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला.

यासंदर्भात भाष्य करताना न्यायालयाने म्हटले आहे की, "सर्वोच्च न्यायालयाने लिव्ह-इन रिलेशनशिपला कायदेशीर मान्यता दिल्यानंतर, अशी प्रकरणे अधिक येऊ लागली आहेत. लिव्ह-इन रिलेशनशिप भारतीय मध्यमवर्गाच्या स्थापित कायद्यांच्या विरुद्ध असल्याने हे खटले न्यायालयात येत आहेत..."

याच बरोबर, लिव्ह-इन रिलेशनशिपमुळे महिलांचे प्रमाणाबाहेर नुकसान होते. असे संबंध संपल्यावर पुरुष  पुढे निघून जातात आणि लग्नही करतात. मात्र, ब्रेकअपनंतर महिलांना जोडीदार शोधणे कठीण होते, असेही न्यायालयाने म्हटले आहे.दरम्यान, आरोपीच्या वर्तनाने महिलेचे संपूर्ण आयुष्य खराब केले आहे. यामुळे आता कुणीही तिच्यासोबत लग्न करण्यास तयार होणार नाही, असे संबंधित तरुणीच्या वकिलाने न्यायालयात म्हटले होते.