शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जेवण बनविण्यावरून झालेल्या भांडणात मुलीने केली बॉयफ्रेण्डची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 10:36 IST

जेवण बनविण्यावरून झालेल्या वादात मुलीने बॉयफ्रेण्डची हत्या केल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्दे जेवण बनविण्यावरून झालेल्या वादात मुलीने बॉयफ्रेण्डची हत्या केल्याची घटना घडली आहे. दिल्लीतील उत्तम नगर भागात शनिवारी ही घटना घडली आहे.जेवण कोण बनवणार यावरून दोघांमध्ये झालेला वाद विकोपाला गेल्याने मुलीने तिच्या बॉयफ्रेण्डवर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली.

नवी दिल्ली, दि. 21- जेवण बनविण्यावरून झालेल्या वादात मुलीने बॉयफ्रेण्डची हत्या केल्याची घटना घडली आहे. दिल्लीतील उत्तम नगर भागात शनिवारी ही घटना घडली आहे. जेवण कोण बनवणार यावरून दोघांमध्ये झालेला वाद विकोपाला गेल्याने मुलीने तिच्या बॉयफ्रेण्डवर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली. इजू मूल असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून तो नायझेरियाचा राहणार असल्याची माहिती मिळते आहे. पोलिसांच्या मते आरोपी एल्वी उजुम्मा हिने याआधीही रागात तिच्या बॉयफ्रेण्डवर चाकूने हल्ला केला होता. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उजुम्माने इजूला शनिवारी दुपारी घरी यायला सांगितलं होतं. त्यानंतर त्या दोघांमध्ये एका विषयावरून भांडण झालं होतं. त्या दोघांच्या भांडणाचा आवाज ऐकुन शेजारच्या लोकांनी त्यांची भांडण थांबवली. पण शेजारची लोक गेल्यावर परत त्यांच्यात भांडण सुरू झाली. त्या भांडणात उजुम्माने इजूची हत्या केली. जेवण कोण बनवणार यावरून आमचा वाद सुरू झाला. भांडण जास्त झाल्यावर इजूने मारहाण केल्याचं उज्जूमाने सांगितलं. 

आरोपी महिलेच्या मते तिने फक्त बॉयफ्रेण्डला घाबरवण्यासाठी चाकू बाहेर काढला होता. पण त्यानंतरही इजूने तिला मारायला पुढे आला होता. स्वतःला वाचविण्यासाठी मी त्याच्यावर हल्ला केला आणि नंतर स्वतःला खोलीत बंद केलं, असं आरोपी महिलेने सांगितलं आहे. यानंतर उजुम्मा खोलीतून बाहेर आल्यावर तिने इजूला रक्तबंबाळ झालेलं पाहिलं.उजुम्माने तिच्या काही मित्रांच्या मदतीने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केला. पण हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

पोलिसांच्या मते, इजुला डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर उजुम्मा घर गेली आणि तिने स्वतःला खोलीत बंद करून ठेवलं. सूचना मिळाल्यानंतर पोलिसांनी तिच्या घरी जाऊन तपास करून तिला अटक केली. उजुम्मा त्या घरात गेल्या तीन महिन्यापासून राहत असून तिचा बॉयफ्रेण्ड नेहमी तिला भेटायला घरी यायचा, असं तिच्या घरातील केअरटेकरने सांगितलं आहे. 

शनिवारी संध्याकाळी त्या दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू होतं. तो मुलगा याआधीही घरी यायचा पण त्यांना असं भांडताना कधी पाहिलं नव्हतं. काहीवेळानंतर इजूच्या गर्लफ्रेण्डला काही मित्रांसोबत इजूला रक्ताने बरबटलेल्या अवस्थेत रिक्षेतून नेताना पाहिल्याचं, शेजाऱ्यांनी सांगितलं आहे.  

टॅग्स :New Delhiनवी दिल्ली