शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या दोन्ही पायलटचा मृत्यू; अरुणाचल प्रदेशात सकाळी कोसळलं होतं 'चित्ता'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 19:43 IST

अरूणाचल प्रदेशातील मंडला हिल्सवर कोसळलेल्या लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या दोन्ही पायलटचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशात गुरुवारी सकाळी कोसळलेल्या लष्करी हेलिकॉप्टर 'चित्ता'च्या दोन्ही पायलटचा मृत्यू झाला आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. खंर तर सकाळी 9.15 च्या सुमारास या हेलिकॉप्टरने अरुणाचल प्रदेशातील बोमडिला जवळून उड्डाण केले होते. 

दोन्ही पायलटचा मृत्यूदरम्यान, उड्डाणानंतर थोड्याच वेळात हेलिकॉप्टरचा एटीसीशी संपर्क तुटला आणि बोमडिलाच्या पश्चिमेकडील मंडलाजवळ मोठा अपघात झाला. माहिती मिळताच वैमानिकांसाठी शोध मोहीम राबवण्यात आली. मात्र, काही तासांनंतर दोन्ही वैमानिकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सध्या अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. यासोबतच मृत वैमानिकांचे मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

 ग्रामस्थांच्या मदतीने मिळाली माहिती माहितीनुसार, लेफ्टनंट आणि मेजरला घेऊन हेलिकॉप्टर आसाममधील सोनितपूर जिल्ह्यातील मिसामरीकडे जात होते. लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी सांगितले की, सकाळी 9.15 च्या सुमारास हेलिकॉप्टरचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी (ATC) संपर्क तुटला. त्यामुळे ते बोमडिलाच्या पश्चिमेकडील मंडलाजवळ कोसळले. घटनेची माहिती मिळताच शोधपथके घटनास्थळी पाठवण्यात आली. स्पेशल इन्व्हेस्टिगेशन सेलचे (SIC) पोलीस अधीक्षक रोहित राजबीर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक ग्रामस्थांनी दिरांगमध्ये अपघातग्रस्त हेलिकॉप्टर पाहिले आणि जिल्हा अधिकार्‍यांना माहिती दिली. दिरांगच्या बंगजलेप येथील ग्रामस्थांनी दुपारी 12.30 च्या सुमारास हेलिकॉप्टर शोधून काढले, ज्यामध्ये आग लागली होती.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेशHelicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटनाIndian Armyभारतीय जवानDeathमृत्यूpilotवैमानिक