शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दोघांचे एकाच मुलीवर प्रेम; मित्रालाच संपविले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 10:44 IST

क्रौर्याची परिसीमा; मृतदेहातून हृदय, गुप्तांग, बोटे, शिर कापून काढले

हैदराबाद  : येथील एका युवकाने (वय २२ वर्षे) आपल्या मित्राची गळा दाबून हत्या केली. हा मित्र युवकाच्या प्रेयसीला सातत्याने मेसेज व काॅल करत होता. युवकाने मित्राचे शिर धडावेगळे केले, तसेच हृदय व गुप्तांग, बोटे कापून काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर तो पोलिस ठाण्यामध्ये स्वत:हून हजर झाला व मित्राची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी युवकाचे नाव हरिहर कृष्णा असून त्याने आपला मित्र नवीन दिलसुखची हत्या केली. हे दोघे जण व हरिहरची प्रेयसी एकाच महाविद्यालयात शिकत होते. हरिहर, नवीन एकाच मुलीवर प्रेम करत होते. मात्र, नवीनने आपल्या मनातील भावना सर्वप्रथम त्या मुलीकडे व्यक्त केल्या. त्याचे व मुलीचे प्रेमसंबंध जुळले व मात्र त्या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. त्यानंतर ही मुलगी व हरिहर यांच्यात प्रेम फुलले. मात्र, यामुळे हरिहर अस्वस्थ झाला होता. 

१७ फेब्रुवारी रोजी नवीन व हरिहर यांनी मद्यप्राशन केले होते. त्यावेळी त्यांची मुलीच्या मुद्द्यावरून बाचाबाची झाली. त्यावेळी संतापाच्या भरात हरिहरने आपल्या मित्राची हत्या केली. 

मृतदेहाची छायाचित्रे प्रेयसीला पाठविलीहत्या केल्यानंतर हरिहरने नवीनच्या मृतदेहाची छायाचित्रे काढली व ती व्हॉट्सॲपवर आपल्या प्रेयसीला पाठविली होती. आता याप्रकरणी पोलिस हरिहरच्या प्रेयसीचीही चौकशी करण्याची शक्यता आहे. 

अंगावर काटा आणणाऱ्या घटनानिक्की यादव, श्रद्धा वालकर यांच्या अतिशय निर्घृण हत्यांनी देश हादरला असतानाच आता हरिहरने मित्राच्या केलेल्या हत्येचे प्रकरण उजेडात आले. नवीनच्या मृतदेहाची हरिहरने ज्या क्रूर पद्धतीने विटंबना केली तो सारा प्रकार अंगावर सरसरून काटा आणणारा आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी