शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अजबच! निवडणूक जिंकण्यासाठी मित्राच्या पत्नीला घेतले उधार, निकालानंतर...

By बाळकृष्ण परब | Updated: January 12, 2021 15:34 IST

Jara Hatke News : निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी नेतेमंडळी वाटेल ते करायला तयार असतात. दरम्यान, असाच एक अजब प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देएका व्यक्तीने निवडणूक लढवण्यासाठी आपल्या मित्राकडून त्याच्या पत्नीला उधार घेतले होतेमात्र ही महिला चेअरमनची निवडणूक जिंकली. तेव्हा तिने तिचा पती आणि मुलांना सोडले आणि पतीच्या मित्रासोबत लग्न केलेया प्रकारामुळे संतापलेल्या या महिलेच्या पहिल्या पतीने आपली पत्नी आणि मित्राविरोधात गुन्हा दाखल केला

देहराडून - निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी नेतेमंडळी वाटेल ते करायला तयार असतात. दरम्यान, असाच एक अजब प्रकार समोर आला आहे. इथे एका व्यक्तीने निवडणूक लढवण्यासाठी आपल्या मित्राकडून त्याच्या पत्नीला उधार घेतले होते. मात्र ही महिला चेअरमनची निवडणूक जिंकली. तेव्हा तिने तिचा पती आणि मुलांना सोडले आणि पतीच्या मित्रासोबत लग्न केले. या प्रकारामुळे संतापलेल्या या महिलेच्या पहिल्या पतीने आपली पत्नी आणि मित्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यातच या महिलेचे दुसऱ्या पतीसोबतही वाद झाले असून, तिने आपल्या सध्याच्या पतीने भावासोबत मिळून बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दोन वर्षांपूर्वी मुरादाबाद येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला नेता होण्याची लहर आली. त्याने मुरादाबाद जिल्ह्यातील आरक्षित नगरपंचायत चेअरमनच्या जागेसाठी निवडणूक लढवण्यासाठी आपल्या मित्राकडे त्याची पत्नी उधार देण्याची मागणी केली. त्यावेळी निवडणूक लढण्यासाठी केवळ कागदावर विवाह होणार, असे ठरले. तसेच निवडणुकीनंतर मित्राला त्याची पत्नी परत केली जाईल, असे ठरले.दरम्यान, उधारीवर पतीच्या मित्राची पत्नी बनलेली ही महिला निवडणूक जिंकली. त्यानंतर मात्र मित्राची नियत बदलली. त्याने मित्राला त्याची पत्नी परत करण्याऐवजी तिच्यासोबत विवाह केला. सदर महिलासुद्धा चेअरमन बनून आपल्या पहिल्या पतीला आणि मुलांना सोडून नव्या पतीसोबत राहू लागली.त्यानंतर या महिलेच्या पहिल्या पतीने जसपूरच्या न्यायालयात विनंती पत्र देऊन मित्राकडून आपल्या पत्नीला परत मिळवून देण्याची विनंती केली. न्यायालयाच्या आदेशावर दोन वर्षांपूर्वी कुंडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हासुद्धा नोंद झाला. दरम्यान, मागच्या काही काळात या महिलाच्या कुटुंबात तिच्या सवतीची ढवळाढवळ वाढली. त्यामुळे चेअरमन बनलेली ही महिला आणि तिच्या दुसऱ्या पतीमध्ये वाद होऊ लागले. त्यामुळे ही महिला स्वतंत्र राहू लागली. त्यानंतर या महिलेने आपल्या दुसऱ्या पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दिली. तसेच मारहाण झाल्याची फिर्याद दिली.

 

 

टॅग्स :ElectionनिवडणूकFamilyपरिवारPoliticsराजकारण