शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानमध्ये 'मिराज'चा जन्म, भारतीय वायू सेनेच्या विजयाचे सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 15:04 IST

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली.

नागौर - राजस्थानच्या नागौर येथे एका नवजातू शिशुचे नामकरण चक्क 'मिराज' असे करण्यात आले आहे. भारतीय वायू सेनेकडून पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात भारतीय वायू सेनेकडून मिराज 2000 फायटर जेट विमानांचा वापर करण्यात आला होता. मंगळवार 25 फेब्रवारी रोजी वायू सेनेने हा हल्ला घडवून पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा बदला घेतला. त्यामुळे या जन्मलेल्या मुलाचे नाव मिराज असे ठेवण्यात आले आहे. 

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. त्यानंतर पाकिस्तानी विमानांनी केलेली घुसखोरी हाणून पाडण्यासाठी त्यांचा माग काढणाऱ्या विमानाचा पाठलाग करताना भारताचे मिग-21 लढाऊ विमान बुधवारी (ता. २७) कोसळले. मात्र, पाकिस्तानवरील हल्ल्यासाठी भारताने मिराज 2000 जेट फायटर या विमानाचा वापर केला होता. 

भारतीय सैन्याच्या या मिराज कामगिरीची आठवण म्हणून राजस्थानच्या नागौर येथील एका कुटुंबीयाने आपल्या मुलाचे नाव मिराज असे ठेवले आहे. त्यामुळे आता या मुलाचे नाव मिराज सिंग राठोड असे आहे. भारतीय सैन्याने मिराज विमानांच्या सहाय्याने केलेल्या यशस्वी एअर स्ट्राईकमुळे आम्ही मुलाचे मिराज नामकरण केल्याचं मुलाचे वडिल श्रावणसिंग राठोड यांनी म्हटलंय. तसेच आम्हाला आशा आहे की, तो भविष्यात नक्कीच सैन्यात भरती होईल, असेही ते म्हणाले. तसेच मिराजचे काका, श्रावणसिंग राठोड यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. मला सोमवारी सकाळी सकाळी दोन गुडन्यूज कानी पडल्या. एक म्हणजे भारतीय वायू सेनेने पाकिस्तानवर केलेला हल्ला आणि दुसरा म्हणजे आमच्या घरात आलेला नवीन पाहुणा. त्यामुळेच आम्ही भारतीय सैन्याच्या विजयाची आठवण म्हणून मुलाचे नाव मिराजसिंग राठोड असे ठेवल्याचं श्रावणसिंग यांनी सांगितलं. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दल