शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील दोन रुग्णालये आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी, तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 20:03 IST

Delhi Bomb Threat e-mails : धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Delhi Bomb Threat e-mails : नवी दिल्ली : दिल्लीतील दोन रुग्णालयांना ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, बुरारी रुग्णालय आणि संजय गांधी रुग्णालयाला धमक्या आल्या आहेत. याशिवाय, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला (IGI) बॉम्बची धमकी मिळाली आहे. 

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, बुरारी रुग्णालय आणि संजय गांधी रुग्णालयात धमकीचा ईमेल आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दिल्ली पोलिसांनीही याप्रकरणी अग्निशमन विभागाला माहिती दिली आहे. तसेच, घटनेची माहिती मिळताच पोलिसांव्यतिरिक्त अग्निशमन विभाग, बॉम्ब आणि श्वान पथकाची पथके रुग्णालयात पोहोचली आहेत. सर्व ठिकाणी शोध सुरू आहे. तसेच, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला (IGI) बॉम्बची धमकी मिळाली आहे. याठिकाणीही पोलीस तपास करत आहेत.  सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. 

अलीकडे एनसीआरमधील १०० हून अधिक शाळांना बॉम्बची धमकी मिळाली होती. यानंतर शाळांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला होता. यानंतर ईमेलॲड्रेसची चौकशी सुरू करण्यात आली. मात्र, याप्रकरणी पोलिसांना कोणताही सुगावा लागलेला नाही.

२५ मे रोजी दिल्लीत मतदान दिल्लीत लोकसभेच्या सातही जागांसाठी २५ मे रोजी मतदान होणार आहे. त्याआधी देशाची राजधानी सुरक्षित ठेवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी आहे. निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासाठी समाजकंटक किंवा दहशतवादी एखादी घटना घडवून आणू शकतात. याला सामोरे जाण्यासाठी सुरक्षा दल सज्ज आहेत.

टॅग्स :delhiदिल्लीBombsस्फोटकेhospitalहॉस्पिटल