श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात असलेल्या लष्कराच्या कोअर बॅटल स्कूल या छावणीत शनिवारी अपघाताने घडलेल्या बॉम्बस्फोटात १८ जवान जखमी झाले. अचानक झालेल्या या बॉम्बस्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी लष्कराने चौकशीचे आदेश दिले आहेत.हा बॉम्बस्फोट नेमका कशामुळे घडला, हे अद्याप समजले नाही. छावणीत प्रशिक्षण सुरू असताना अपघाताने एका बॉम्बचा स्फोट झाला, असे काही सूत्रांनी सांगितले. तथापि, लष्कराने त्याला दुजोरा दिला नाही. हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे चौकशीनंतरच कळेल, असे लष्कराचे प्रवक्ते कर्नल एन. एन. जोशी यांनी म्हटले आहे. त्यांचे जीवन कठीणसीमेवर आज तुलनेने शांतता होती. जम्मू आणि काश्मिरचे आरोग्यमंत्री चौधरी लालसिंग यांनी पाकिस्तानच्या गोळीबारात जखमी झालेल्या नागरिकांची शनिवारी रुग्णालयात जाऊन भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. जखमींना विनाशुल्क आणि सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. पाक सातत्याने आगळीक करीत असल्यामुळे सीमावर्ती भागातील लोकांचे जीवन दुष्कर बनले आहे, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
काश्मिरात लष्करी छावणीत बॉम्बस्फोट
By admin | Updated: August 30, 2015 00:57 IST