शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
2
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
3
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
4
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
5
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
6
T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य
7
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
8
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
9
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
10
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
11
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
12
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
13
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
14
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
15
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
16
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
17
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
18
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
19
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
20
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!

IAS दर्जाच्या अधिका-याचा व्हीआयपी अतिथीगृहाबाहेर सापडला मृतदेह

By admin | Published: May 17, 2017 12:33 PM

IAS दर्जाचे अधिकारी अनुराग तिवारी यांचा मृतदेह हजरतगंजमधील मीरा बाई या व्हीआयपी अतिथीगृहाबाहेर आज सकाळी सापडला आहे.

ऑनलाइन लोकमतलखनऊ, दि. 17 - कर्नाटकमधील आयएएस दर्जाच्या अधिका-याचा मृतदेह सापडला आहे. 35 वर्षांचे IAS दर्जाचे अधिकारी अनुराग तिवारी यांचा मृतदेह हजरतगंजमधील मीरा बाई या व्हीआयपी अतिथीगृहाबाहेर आज सकाळी सापडला आहे. तिवारी यांचा मृत्यू अनैसर्गिक कारणामुळे झाला आहे. आम्ही शवविच्छेदनाच्या अहवालाची वाट पाहत आहोत. तिवारी यांची बदली बंगळुरूमधल्या बहरिच जिल्ह्यात अन्न आणि नागरी पुरवठा आयुक्तपदी करण्यात आली होती. ते काही खासगी कामानिमित्त उत्तर प्रदेशात आले होते. त्यावेळी ते गेस्ट हाऊसच्या रूम नंबर 19मध्ये थांबले होते. तिवारी यांचे सहकारी सिंग यांनी त्यांच्यासाठी रूम बुक केली होती. तिवारी आणि सिंग हे दोघेही 2007मध्ये अधिकारी म्हणून सरकारी सेवेत रुजू झाले. ज्यावेळी सिंग बॅडमिंटन खेळण्यासाठी सकाळी 6 वाजता गोमतीनगर स्टेडिअमध्ये गेले, त्याच वेळी तिवारीही मॉर्निंग वॉक करण्यासाठी बाहेर पडले. गेस्ट हाऊसच्या रूमपासून 300 मीटरच्या अंतरावरील रोडवरच तिवारी कोसळले. रस्त्यावर काही रक्ताचे डागही आढळून आले आहेत. पोलिसांनी डीआयडी जे. एस. सिंग आणि एसएसपी दीपक कुमार यांना कळवल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. तिवारी यांना सामान्य रुग्णालयात भरती केले असता, त्यांना मृत घोषित करण्यात आलं होतं. दीपक कुमार यांच्या मते, तिवारी यांना फीट आल्यामुळे ते कोसळले असावेत. मात्र आम्ही शवविच्छेदनाच्या अहवालाची वाट पाहत आहोत. तिवारी यांचे कुटुंबीय दुपारी 12 वाजता लखनऊमध्ये दाखल झाल्याची माहिती सिंग यांनी दिली आहे. तिवारींना काही कौटुंबिक त्रास होता का, याचा आम्ही शोध घेत आहोत, असंही सिंग म्हणाले आहेत.