शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
3
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
4
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
5
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
6
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
7
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
8
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
9
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
10
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
11
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
12
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
13
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
14
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
15
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
16
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
17
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
18
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
19
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
20
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

लुधियाना कोर्टाच्या तिसऱ्या मजल्यावर स्फोट, दोघांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 13:24 IST

Blast inside Ludhiana court complex: स्फोट होताच कोर्टाच्या आवारात चेंगराचेंगरी झाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट कोर्टाच्या बाथरूममध्ये झाला.

लुधियाना : पंजाबमधील लुधियाना येथील कोर्ट कॉम्प्लेक्समध्ये गुरुवारी स्फोट झाला. या स्फोटात काही लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच, हा स्फोट तिसऱ्या मजल्यावर झाल्याचे सांगण्यात येत आहे. या स्फोटामुळे तळमजल्यावरील वाहनांचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोर्ट कॉम्प्लेक्समध्ये IED स्फोट झाला आहे. यासाठी अत्यंत जड स्फोटकांचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोट होताच कोर्टाच्या आवारात चेंगराचेंगरी झाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट कोर्टाच्या बाथरूममध्ये झाला. कोणीतरी येऊन हा स्फोट घडवून आणल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. सध्या घटनास्थळावरून जखमींना रुग्णालयात नेण्यात येत आहे. दुपारी 12.45 च्या सुमारास हा स्फोट झाला. सध्या बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचले आहे. 

गुरुदासपूरमध्ये आढळला होता टिफिन बॉम्बया महिन्यात गुरुदासपूर जिल्ह्यात चार हातबॉम्ब आणि टिफिन बॉम्ब सापडले होते. याबाबत पंजाब पोलिसांनी ही माहिती दिली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे ग्रेनेड आणि टिफिन बॉम्ब एका गोणीत लपवण्यात आले होते. सीमावर्ती जिल्ह्यातील सलेमपूर अरैयन गावातून पोलिसांनी हे जप्त केले  होते. याच्या दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी राज्यातील दीनानगरमधून मोठ्या प्रमाणात आरडीएक्स जप्त केले होते.

 

टॅग्स :PunjabपंजाबBlastस्फोट