शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भय्यूजी महाराजांना ‘ती’ तरुणी आणि सेवादार करीत होते ब्लॅकमेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 04:39 IST

भय्यूजी महाराजांच्या आत्महत्येला पलक नावाची एक तरुणी आणि सेवादार विनायक दुधाळे व शरद देशमुख हे कारणीभूत असल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली.

इंदूर : भय्यूजी महाराजांच्या आत्महत्येला पलक नावाची एक तरुणी आणि सेवादार विनायक दुधाळे व शरद देशमुख हे कारणीभूत असल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. दाती महाराज यांचे प्रकरण समोर आल्यानंतर भय्यूजी महाराज विचलित झाले होते. त्याचा फायदा घेत या तिघांनी महाराजांवर पलकशी लग्न करण्यासाठी दबाव वाढविला होता. लग्न न केल्यास दाती महाराजांसारखे तुरुंगात जावे लागेल, अशा धमक्या ते महाराजांना देत होते, असे तपासातून पुढे आले आहे.डीआयजी हरिनारायणाचारी मिश्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, भय्यूजी महाराजांचा ड्रायव्हर कैलास पाटील याला वकील निवेश बडजात्या यांच्याकडे पाच कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक झाल्यानंतर या प्रकरणाला खऱ्या अर्थाने वाचा फुटली. कैलास पाटीलने दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी १२५ जणांची चौकशी केली, तसेच २८ लोकांचे जबाब घेतले.मिश्रा यांनी सांगितले की, भय्यूजी महाराजांची पहिली पत्नी माधवी यांचे निधन झाल्यानंतर विनायक व शरद यांनी कट रचून पलक हिला महाराजांच्या आयुष्यात आणले. महाराज आणि पलक यांच्यातील अश्लील चॅटिंग त्यांनी सेव्ह करून ठेवले. काही आपत्तीजनक व्हिडिओही बनविले. या सामग्रीचा वापर करून ते महाराजांना ब्लॅकमेल करू लागले. महाराजांनी पलकशी लग्न करावे, अशी त्यांची मागणी होती.१७ एप्रिल २0१७ रोजी महाराजांनी आयुषी यांच्यासोबत दुसरे लग्न केले. तेव्हा पलक आणि तिच्या साथीदारांनी जोरदार हंगामा केला. १६ जूनच्या आत लग्न करण्याची मुदत पलकने महाराजांना दिली होती. दाती महाराजांना अटक झाल्यानंतर तिघांनी महाराजांवर आणखी दबाव वाढविला. विनायक महाराजांना काबूत ठेवत असे, पलक लग्नासाठी दबाव वाढवीत असे, तर शरद पैसे उकळीत असे, असे समोर आले आहे. भय्यूजी महाराजांना काही औषधे सुरू होती. त्याचा फायदा घेत हे तिघे त्यांना नशिल्या औषधांचा ओव्हर डोस द्यायचे. त्यामुळे महाराजांचे मानसिक स्वास्थ्य बिघडत गेल्याचे उघडकीस आले आहे.