शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॅकलिस्टची भीती; पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे २० तळ बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 22:54 IST

नियंत्रण रेषेवरील घुसखोरीच्या घटनादेखील कमी झाल्या

नवी दिल्ली: फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सकडून ब्लॅकलिस्ट होण्याच्या भीतीनं पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे २० तळ बंद करण्यात आले आहेत. जानेवारीपासून पाकिस्ताननंदहशतवाद्यांचे तळ बंद करण्यास सुरुवात केली. त्यामुळेच यंदाच्या उन्हाळ्यात घुसखोरीचे फारसे प्रकार घडले नसल्याची माहिती गुप्तचर विभागातील सूत्रांच्या हवाल्यानं 'इंडियन एक्स्प्रेस'नं दिली आहे. दहशतवाद्यांच्या तळांवरुन काश्मीरमध्ये घुसखोरी केली जाते. मात्र या वर्षात आतापर्यंत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे २० तळ बंद करण्यात आले आहेत. जून महिन्यात  फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सची (एफएटीएफ) बैठक झाली. त्या बैठकीत दहशतवादाच्या मुद्द्यावरुन ब्लॅकलिस्ट केली जाऊ नये यासाठी पाकिस्ताननं हे पाऊल उचललं. एफएटीएफची पुढील बैठक ऑक्टोबरमध्ये होणार आहे. पॅरिसमध्ये होणाऱ्या या बैठकीत पाकिस्तानला मनी लॉण्ड्रिंग आणि टेरर फंडिंगच्या मुद्द्यावरुन ब्लॅकलिस्ट करायचं का, याबद्दलचा निर्णय होईल. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांची संख्या कमी झाल्यानं नियंत्रण रेषेवरील कुरापती कमी झाल्या आहेत. सीमारेषेवरुन होणाऱ्या घुसखोरीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं सूत्रांनी सांगितली. तब्बल तीन दशकांनंतर काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर इतकी शांतता पाहायला मिळत असल्याचंदेखील सूत्रांनी सांगितलं. नियंत्रण रेषेसोबतच काश्मीरमधील परिस्थितीतही मोठी सुधारणा झाली आहे. काश्मीरमधील दहशतवादी कारवाया नियंत्रणात आल्या आहेत.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादterroristदहशतवादी