शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

Blackbuck poaching case- सलमानला जेलमध्ये धाडणारा 'बिष्णोई समाज' नक्की आहे तरी कोण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 16:28 IST

जोधपूर न्यायालयाने काळवीट शिकार प्रकरणात अभिनेता सलमान खानला दोषी ठरवत त्याला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि 10 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

राजस्थानः जोधपूर न्यायालयाने काळवीट शिकार प्रकरणात अभिनेता सलमान खानला दोषी ठरवत त्याला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि 10 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. तब्बल 20 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हा खटला निकाली निघाला. राजस्थानमधील बिष्णोई समाजाने केलेला पाठपुरावा या खटल्यात महत्त्वपूर्ण ठरलाय. परंतु हा बिष्णोई समाज म्हणजे नेमका आहे तरी कोण ?जोधपूरमधल्या खेडजली गावात 1736 सालापासून बिष्णोई समाज खेजरीच्या झाडांची रक्षा करतोय. हा गाव नेहमीच हिरवळीनं सजलेला असायचा. परंतु काही विघ्नसंतोषी लोक खेजरीची झाडं कापण्यासाठी खेडजलीमध्ये पोहोचले. परंतु बिष्णोई समाजाच्या लोकांनी त्यांना खेजरीची झाडं तोडू देण्यास विरोध केला. झाडांना कापू नका असा तगादा लावूनही गावक-यांना न जुमानता त्या लोकांनी झाडे तोडण्याचा उपद्व्याप सुरूच ठेवला. अखेर खेडजलीची राणी अमृतादेवी बिष्णोईनं गुरू जाम्भेश्वरांची शपथ घेत झाडांना मिठी मारली आणि झाडं तोडू न देण्याचा इशारा दिला. त्यानंतर इतर गावक-यांनी तिच्या पाठोपाठ झाडांना आलिंगन दिली. परंतु झाडं तोडण्यासाठी आलेल्या विघ्नसंतोषी लोकांनी अमृतादेवी बिष्णोईनं झाडापासून दूर सारत त्यांना ठार मारलं. त्यानंतर या हिंसाचारात 363 बिष्णोई समाजाच्या लोकांना प्राण गमवावे लागले असून, त्यांना शहिदाचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे आता प्रत्येक वर्षी खेडजली गावात एका जत्रेचंही आयोजन केलं जातं. अमृता देवीच्या नावानं केंद्र व राज्य सरकार अनेक पुरस्कारही देत असते.  

  • काय आहेत बिष्णोई समाजाच्या चालीरिती ?

बिष्णोई समाजाला हे नाव भगवान विष्णूंकडून प्राप्त झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. बिष्णोई समाजाचे लोक पर्यावरणाचे पूजक असतात. या समाजातील जास्त करून लोक जंगल आणि वाळवंटात राहण्याला पसंती देतात. त्यांची मुलं जंगली प्राण्यांबरोबर खेळता-खेळता मोठी होतात. बिष्णोई समाजातील लोक हिंदूंचे गुरू श्री जम्भेश्वर यांना देव मानतात. या समाजातील लोक त्यांच्या 29 नियमांचं कडकरीत्या पालन करतात. बिष्णोई समाज 29 नियमांचं पालन करतो. 29 नियमांचं पालन करत असल्यानेच बिष्णोई शब्द 20(बीस) आणि 9(नौ)पासून तयार होतो. 1485मध्ये बिष्णोई समाजाची स्थापना झाली. बिष्णोई समाजातील महिला जंगली जनावरांचं पालन-पोषण करत असून, त्यांचा आपल्या मुलांसारखा सांभाळ करतात. या समाजातील महिलाच नव्हे तर पुरुषही बेवारस असलेल्या हरणांच्या पिल्लांचं घरातील एखाद्या सदस्यासारखंच पालन-पोषण करतात. 

टॅग्स :Salman Khanसलमान खानBlackbuck poaching caseकाळवीट शिकार प्रकरण