शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

ब्लू व्हेल गेममुळे लखनऊतील शाळांमध्ये स्मार्टफोनवर बंदी; पालकांनी दक्षता घेण्याचं शाळेचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 08:31 IST

व्हेल गेममुळे मुलांच्या आत्महत्यांचे प्रकार घडत असल्याने उत्तर प्रदेशात लखनऊमधील शाळांमध्ये स्मार्टफोनवर बंदी घालण्यात आली आहे.

ठळक मुद्दे व्हेल गेममुळे मुलांच्या आत्महत्यांचे प्रकार घडत असल्याने उत्तर प्रदेशात लखनऊमधील शाळांमध्ये स्मार्टफोनवर बंदी घालण्यात आली आहे.ब्लू व्हेल चॅलेंज हा ऑनलाईन गेम घातक असून त्यात सहभागी व्यक्तीला अॅडमीनकडून आत्महत्या करायला भाग पाडलं जातं.जगभरात या गेमने दोनशे पेक्षा जास्त अधिक बळी घेतले आहेत.

लखनऊ, दि. 11- मुलांना आत्महत्या करायला प्रवृत्त करणाऱ्या ब्लू व्हेल गेमने सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे. मुलांनी ब्लू व्हेलच्या नादाला लागू नये, यासाठी आवाहनही केलं जातं आहे. आता शाळांनीसुद्धा त्यासाठी पुढाकार घेतला आहे. ब्लू व्हेल गेममुळे मुलांच्या आत्महत्यांचे प्रकार घडत असल्याने उत्तर प्रदेशात लखनऊमधील शाळांमध्ये स्मार्टफोनवर बंदी घालण्यात आली आहे. ब्लू व्हेल चॅलेंज हा ऑनलाईन गेम घातक असून त्यात सहभागी व्यक्तीला अॅडमीनकडून आत्महत्या करायला भाग पाडलं जातं. जगभरात या गेमने दोनशे पेक्षा जास्त अधिक बळी घेतले आहेत.

मुलांच्या पालकांनी याबाबत दक्षता बाळगणं गरजेचं असून मुलं स्मार्टफोन वापरणार नाहीत, याकडे लक्ष द्यावं, असं शाळांचं म्हणणे आहे. ब्लू व्हेल गेममुळे लखनऊच्या इंदिरानगर भागातील आदित्यन वर्धन या चौदा वर्षांच्या मुलाने आत्महत्या केली होती. त्याचा संबंध ब्लू व्हेल गेमशी होता. त्यामुळे शाळांमध्ये स्मार्टफोनवर बंदी घालण्यात आली असून विद्यार्थ्यांची अचानक तपासणी करण्यात येणार आहे. शिक्षक व पालक यांना याबाबत काळजी घ्यायलाही सांगण्यात आलं आहे, अशी माहिती जिल्हा शाळा निरीक्षक मुकेश कुमार सिंह यांनी सांगितलं आहे. 

मुलं अचानक अस्वस्थ किंवा तणावाखाली दिसली तर पालकांनी शंका घेऊन त्यांची विचारपूस करणं गरजेचं आहे. तसंच अशा मुलांचं समुपदेशन केलं जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. उत्तर प्रदेश पोलिसांनी सर्व जिल्ह्यांच्या पोलीस प्रमुखांना ब्लू व्हेलवर बंदी घालायला सांगितलं आहे, पण हा गेम डाऊनलोड करण्यासाठी काही लिंक असल्याने त्यावर बंदी घालणं शक्य होत नाही, ही सद्यस्थितील आहे. त्यासाठी संबंधित ऑनलाइन कंपन्यांशी संपर्क साधून त्यांना त्या लिंक काढून टाकायला सांगावं लागणार आहे. पोलीस अधिकारी शाळेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मुलांना हा गेम खेळण्यापासून परावृत्त करतील. केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान खात्याने याआधीच या गेमच्या लिंक ज्यावरून येतात त्या फेसबुक, गुगल व इन्स्टाग्राम यांना त्या काढून टाकण्याचा आदेश दिला आहे, असं पोलीस महासंचालक सुलखन सिंह यांनी सांगितलं आहे. 

टॅग्स :Blue Whaleब्लू व्हेलMobileमोबाइल