शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आता विमानाप्रमाणेच रेल्वेतही ब्लॅक बॉक्स; दुर्घटना रोखण्यात मदत होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 12:38 IST

रेल्वे गाड्यांमधील ब्लॅक बॉक्स अपघात रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. 

लखनऊ: रेल्वेनं प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. यापुढे रेल्वे गाड्यांमध्ये विमानांप्रमाणेच ब्लॅक बॉक्स असणार आहे. ब्लॅक बॉक्स असलेल्या रेल्वेच्या डब्ब्यांचं अनावरण रायबरेलीतील रेल कोच फॅक्टरीमध्ये करण्यात आलं. रेल्वे गाड्यांमधील ब्लॅक बॉक्स अपघात रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. 'ब्लॅक बॉक्स असलेले स्मार्ट कोचेस रेल्वे वाहतूक क्षेत्रात मैलाचा दगड ठरतील. यामुळे रेल्वे प्रवास आणखी सुरक्षित आणि सुखकर होईल,' असं रायबरेली कोच फॅक्टरीचे व्यवस्थापक राजेश अगरवाल यांनी सांगितलं. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त ब्लॅक बॉक्स असलेल्या स्मार्ट कोचेसचं अनावरण करण्यात आलं. ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून अंतर्गत वायर्सचं तापमान मोजलं जाईल. याशिवाय केबलची स्थितीदेखील तपासली जाईल. त्यामुळे शॉर्ट सर्किट आणि त्यामुळे होणारं नुकसान टाळता येऊ शकेल. ब्लॅक बॉक्समुळे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होईल. याशिवाय त्यांना मिळणाऱ्या सुविधांमध्येही वाढ होईल.रेल्वेतील ब्लॅक बॉक्स विमानातील ब्लॅक बॉक्सच्या तुलनेत अधिक कार्यक्षम आणि अत्याधुनिक असतील, असं मुख्य अभिनेते इंद्रजित सिंग यांनी सांगितलं. 'विमानातील ब्लॅक बॉक्स अपघात रोखू शकत नाहीत. मात्र स्मार्ट कोचेसमधील ब्लॅक बॉक्स अपघात रोखू शकतात. अनेकदा एक्स्प्रेस गाड्या रुळांवरुन घसरतात. असे अपघात रोखण्यात ब्लॅक बॉक्स महत्त्वाची भूमिका बजावेल. ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून विविध निकष लक्षात घेऊन सुरक्षेचं मूल्यमापन केलं जाईल. यावेळी काही दोष आढळल्यास त्याची माहिती आपोआप देखरेख करणाऱ्या यंत्रणेला देण्यात येईल. त्यानंतर आवश्यक ती दुरुस्ती केली जाईल,' अशी माहिती सिंग यांनी दिली.  

टॅग्स :railwayरेल्वे