शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकमध्ये भाजपकडून चोरटी शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 05:33 IST

काँग्रेसचा आरोप; लोकसभेतून सभात्याग, राज्यसभाही तहकूब

नवी दिल्ली : चोरटे ज्या पद्धतीने शिकार करतात, त्या पद्धतीचे राजकारण भाजपकडून कर्नाटकमध्ये सुरू आहे, असा आरोप करीत काँग्रेसच्या खासदारांनी मंगळवारी लोकसभेतून सभात्याग केला. मात्र, या आरोपाचा भाजपने इन्कार केला आहे.

कर्नाटकमध्ये काँग्रेस व जनता दल (एस)च्या काही आमदारांनी राजीनामे देऊन कुमारस्वामी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. हे राजीनामे मंजूर झाल्यास ते सरकार कोसळू शकते. या घडामोडींचा मुद्दा काँग्रेसने लोकसभेत शून्य प्रहरात उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी परवानगी नाकारली. या विषयावर सोमवारी चर्चा झाली असून, केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांनी त्याला उत्तरही दिले आहे, असे बिर्ला यांनी सांगितले.

यावर काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी म्हणाले की, कुमारस्वामी सरकारला भाजपाकडून लक्ष्य केले जात आहे. कर्नाटकमध्ये आज जे सुरू आहे ते उद्या मध्यप्रदेशमध्ये सुरू होईल. चोरट्या शिकारीचे हे राजकारण थांबले पाहिजे. त्यांना प्रत्युत्तर देताना राजनाथसिंह म्हणाले की, कर्नाटकमध्ये काँग्रेस व जनता दल (एस)मध्ये जे सुरू आहे, तो त्यांचा अंतर्गत मामला आहे. अशा मुद्यांवर आम्ही सभागृहाचे कामकाज विस्कळीत होऊ देणार नाही. त्यानंतर संतप्त काँग्रेस सदस्यांनी भाजपाविरोधात घोषणा दिल्या. काही वेळाने काँग्रेस व द्रमुकच्या सदस्यांनी सभात्याग केला.

कुमारस्वामी सरकार पाडण्यासाठी सुरू असलेल्या हालचालींचा तीव्र निषेध करीत काँग्रेसने राज्यसभेत गदारोळ माजविल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

सकाळी कामकाज सुरू होताच काँग्रेसच्या सभापतींसमोरील हौद्यात जमा होऊन भाजपाविरोधात घोषणा दिल्या.त्यातच सार्वजनिक उपक्रमांचे खासगीकरण केले जात असल्याच्या निषेधार्थ तेलुगू देसमच्या सदस्यांनीही घोषणाबाजी सुरू केली. दुपारच्या सत्रात प्रश्नोत्तराच्या तासाच्या वेळीही हा गदारोळ आणखी वाढला होता.राहुल गांधी यांनी दिल्या घोषणा‘तानाशाही बंद करो’, ‘शिकार की राजनीती बंद करो बंद करो’, अशा घोषणा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी मोदी सरकारविरोधात लोकसभेत दिल्या.या घोषणा लिहिलेले फलक उंचावून व घोषणाबाजी करून काँग्रेसच्या खासदारांनी निषेध व्यक्त केला. कर्नाटकमध्ये भाजपाकडून लोकशाहीची हत्या करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसने केला.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणkumarswamyकुमारस्वामीlok sabhaलोकसभा