शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची दक्षिणस्वारी लोकसभेसाठीच; प्रादेशिक पक्ष बलवान, गुलाल लागण्याची शक्यता कमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 06:00 IST

केरळमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत तिरुवनंतपूरम मतदारसंघात भाजप उमेदवाराने शशी थरूर यांचा चांगलाच घामटा काढल्याने भाजपचा आत्मविश्वास कमालीचा दुणावला आहे.

पोपट पवारतिरुवनंतपूरम : पश्चिम बंगाल, आसाम, पद्दुचेरी, केरळ आणि तामिळनाडू या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपने आपली सारी शक्ती पणाला लावली असली तरी दक्षिणेतील केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष बलवान असल्याने भाजपला येथे गुलाल लागण्याची सुतरामही शक्यता नाही. मात्र, विधानसभेच्या मैदानावरच लोकसभेची पेरणी करून भाजप दक्षिणेत आपले अस्तित्व आणखी मजबूत करण्याच्या तयारीत आहे. कर्नाटक वगळता दक्षिणेतील इतर राज्यांमध्ये भाजप अजूनही चाचपडत आहे. याचेच शल्य वारंवार बोचत असल्याने भाजप बंगाल आणि आसाम जिंकण्यासाठी ज्या ताकदीने रणांगणात उतरला आहे, त्याच ताकदीने दक्षिणेतील केरळ आणि तामिळनाडूतही जोर लावू पाहत आहे. 

केरळमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत तिरुवनंतपूरम मतदारसंघात भाजप उमेदवाराने शशी थरूर यांचा चांगलाच घामटा काढल्याने भाजपचा आत्मविश्वास कमालीचा दुणावला आहे. शबरीमाला प्रकरणाचा मुद्दा लावून धरत भाजपने येथे डावे आणि काँग्रेसच्या बरोबरीने तिसरा पर्याय निर्माण केला आहे. गत विधानसभा निवडणुकीत केवळ नेमम ही एकमात्र विधानसभेची जागा पदरात पडलेल्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत दहा जागांवर डावे आणि काँग्रेसला कडवे आव्हान दिले आहे. 

उत्तरेतील कसर दक्षिणेत भरून काढणार२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थान या राज्यांमध्ये मोठे यश मिळवले होते. मात्र, वारंवार ही राज्ये साथ देतीलच याची शाश्वती नसल्याने भाजपने इतर राज्यांतही पर्याय धुंडाळण्याची तयारी सुरू केली आहे. 

उत्तरेत अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत तर त्यांची कसर दक्षिणेत यश मिळवून काढण्याची रणनीती भाजपने आखली आहे. त्यासाठी विधानसभा निवडणुकीत या राज्यांमध्ये ताकद लावून लोकसभेला काही जागा सेफ करण्याचा भाजपचा गेमप्लॅन आहे.

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूक