शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाला भाजपाचा ‘सेवा दिवस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:40 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ६७वा वाढदिवस स्वत: पंतप्रधानांनी साजरा केला नाही, पण भाजपाने हा दिवस ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा केला. अनेक नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदींचे अभिष्टचिंतन केले.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ६७वा वाढदिवस स्वत: पंतप्रधानांनी साजरा केला नाही, पण भाजपाने हा दिवस ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा केला. अनेक नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदींचे अभिष्टचिंतन केले.भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी खास ब्लॉग लिहून स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. मोदी यांची तुलना सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी करून, शाह यांनी म्हटले आहे की, सरदार पटेल यांनी देशाची प्रादेशिक अखंडता अबाधित ठेवली. आंबेडकरांनी सामाजिक एकता प्रस्थापित केली, तर मोदींनी देशाच्या आर्थिक एकीकरणाचा पाया रचला. मोदी यांची गरिबांबाबतची जी संवेदनशीलता आहे, त्यामुळेच गरिबी निर्मूलनाचे ऐतिहासिक पाऊल आकार घेत आहे. भारताच्या इतिहासात प्रथमच असे होत आहे. नोटाबंदीनंतर विरोधक भलेही टीका करत असोत, पण या निर्णयामुळे पारदर्शकता वाढली आहे. शाह यांनी मुद्रा योजना, जनधन खाते, सर्जिकल स्ट्राइक आणि नोटाबंदी यांचा उल्लेख केला. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, मुख्तार अब्बास नक्वी, महेश शर्मा, हरदीप सिंह पुरी आणि अल्फोंस कन्नानथानम यांनी ‘स्वच्छता हीच सेवा’या उपक्रमात रविवारी सहभाग घेतला.>आईचे आशीर्वाद घेतलेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढदिवसानिमित्त रविवारी आई हीराबेन यांचे आशीर्वाद घेतले. सकाळी गांधीनगरच्या बाहेरील भागातील ‘वृंदावन बंग्लोज’ येथे आपल्या लहान भावाच्या निवासस्थानी मोदी दाखल झाले आणि आईचे आशीर्वाद घेतले. मोदी येथे २० मिनिटे होते.नेत्यांनी दिल्या शुभेच्छाराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. दीर्घायुष्य आणि राष्ट्राची सेवा करण्यासाठी शुभेच्छा असे टिष्ट्वट त्यांनी केले.याशिवाय गृहमंत्री राजनाथ सिंह, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, अरुण जेटली, मनेका गांधी, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, सुरेश प्रभू, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, भाजपाचे देशातील खासदार, आमदार, नेते आणि विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी चित्रपट व विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी मोदी यांना शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :BJPभाजपा