शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

विरोधी पक्षांच्या आघाडीला भाजपाचं आघाडीनंच प्रत्युत्तर, NDAमधील घटक पक्षांचं बलाबल किती? अशी आहे आकडेवारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 09:49 IST

BJP NDA: काही महिन्यांवर आलेल्या २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज देशातील सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन प्रमुख आघाड्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

काही महिन्यांवर आलेल्या २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज देशातील सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन प्रमुख आघाड्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. एकीकडे कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. त्यात सुमारे २४ हून अधिक पक्ष सहभागी होणार आहेत. तर दुसरीकडे राजधानी दिल्लीमध्ये सत्ताधारी भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)ची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी सुमारे ३० हून अधिक पक्षांना निमंत्रण देण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील शिवसेना शिंदे गट, आरपीआय (ए), अजित पवार गट यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. तर उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू आणि पूर्वोत्तर राज्यांमधील अनेक पक्षांना या बैठकीसाठी निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात काँग्रेसकडून देशात एक व्यापक आघाडी उघडण्याची मोर्चेबांधणी सुरू असताना भाजपानेही आपल्या नेतृत्वाखालील एनडीएमधील घटक पक्षांचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे.आज होणाऱ्या बैठकीसाठी भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी एनडीएच्या बैठकीसाठी ३८ पक्षांना निमंत्रण पाठवण्यात आल्याचे सांगितले. दरम्यान, भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील होत असलेल्या घटक पक्षांची ताकद किती आहे, ते पक्ष कुठे प्रबळ आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बिहारचा विचार केल्यास जितनराम मांझी, उपेंद्र कुशवाहा आणि चिराग पासवान यांचा विचार केल्यास सुमारे २० टक्के मतांवर त्यांची चांगली पकड आहे. बिहारमधील सुमारे १६ टक्के दलित आणि महादलित मतदार आहेत. यामधील टक्के पासवान आहेत. राज्यातील एकूण मतदारांमध्ये महादलितांची संख्या १० टक्के आहे. यामध्ये सहा टक्के मुसहर आहेत. जितनराम मांझी हे या जातीचं प्रतिनिधित्व करतात. तर उपेंद्र कुशवाहा हे कोईरी जातीचं प्रतिनिधित्व करतात. त्यांची संख्या सुमारे ८ टक्के आहे. या सर्व मतदारांची मोट बांधून लालू आणि नितीश कुमार यांच्या पक्षांचा पराभव करण्याचा भाजपा प्रयत्न आहे.

उत्तर प्रदेशचा विचार केल्यास पूर्वांचलमधील तीन पक्षांना एनडीएच्या बैठकीसाठी निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. अनुप्रिया पटेल यांच्या अपना दल (एस), ओमप्रकाश राजभर यांचा सुभासपा आणि संजय निषाद यांच्या निषाद पार्टी या पक्षांच्या मदतीने पूर्वांचलमधील आपली समिकरणे जुळवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. पूर्वांचलमधील सुमारे डझनभर मतदारसंघांमध्ये राजभर मतदार जय-पराजयाचं गणित निश्चित करतात. राजभर मतदारांसोबत जर निषाद आणि कुर्मी मतदार भेटले तर पूर्वांचलमधील अनेक मतदारसंघात विजय निश्चित होईल, असं भाजपाला वाटतं. पूर्वांचलमध्ये लोकसभेच्या २६ जागा आहेत. येथे २०१९ मध्ये ६ जागांवर भाजपाचा पराभव झाला होता.

तामिळनाडूमधील राजकारण द्विध्रुवीय असून, येथे भाजपाची ओळख उत्तर भारतातील पक्ष अशी आहे. त्यामुळे तामिळनाडूमध्ये एआयएडीएमके, पीएमके, आयएमकेएमके अशा पक्षांना सोबत घेऊन अस्तित्व निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. सध्या तामिळनाडूमध्ये भाजपाचे चार आमदार आहेत. तर पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षासोबत मिळुन आंध्र आणि तेलंगाणामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतची युती तुटल्यानंतर होणाऱ्या संभाव्य नुकसानाची भरपाई भाजपाने शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांना सोबत आणून करण्याचा प्रयत्न केला आहे. २०१९ मध्ये भाजपाने महाराष्ट्रात २३ जागा जिंकल्या होत्या. तो आकडा कायम ठेवण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल.

छोटे पक्ष सोबत असण्या-नसण्याचे फायदे तोटे भाजपाने २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनुभवले आहेत. अटीतटीच्या लढतींमध्ये या छोट्या पक्षांची ४-५ टक्के मतं अनेकदा निर्णायक ठरतात. तसेच ही मतं त्यांच्या आघाडीतील सहकाऱ्याकडे सहजपणे वळतात. आता भाजपा छोट्या पक्षांना सोबत आणून काँग्रेसच्या नेतृत्वात एकत्र येत असलेल्या विरोधी पक्षांना रोखण्यात यशस्वी ठरतो का, हे पाहावे लागेल.  

टॅग्स :BJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदी