शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

‘मोदी मॅजिक’वर भाजपचा भरवसा पाच राज्यांतील निवडणुकीत विकासाच्या प्रचारावर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 02:17 IST

नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोरामच्या विधानसभा निवडणुकांमध्ये प्रत्येक राज्यात गटबाजीने त्रस्त असलेल्या भाजपचे केंद्रीय नेतृत्व कोणत्याही प्रकारची जोखीम उचलू इच्छित नाही.

- संजय शर्मा 

नवी दिल्ली : भाजप पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मोदी मॅजिक’ला विजयाचा फॉर्म्युला मानत आहे. सर्व राज्यांत भाजप श्रेष्ठींनी निर्देश दिले आहेत की, संपूर्ण निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर, त्यांच्या कामावर केंद्रित करून लढायची आहे. स्थानिक नेते व त्यांच्या कामांची जनतेला आठवणही द्यायची नाही.

नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोरामच्या विधानसभा निवडणुकांमध्ये प्रत्येक राज्यात गटबाजीने त्रस्त असलेल्या भाजपचे केंद्रीय नेतृत्व कोणत्याही प्रकारची जोखीम उचलू इच्छित नाही. त्यामुळे सर्व राज्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, संपूर्ण निवडणूक मोदींचे नेतृत्व व त्यांच्या केंद्र सरकारच्या गरीब कल्याण योजनांवरच लढायची आहे. स्थानिक नेत्यांचे ना नाव घ्यायचे आहे ना त्यांच्या कोणत्याही कामाचा उल्लेख करायचा आहे.

भाजपचे हे निर्देश म्हणजे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे व छतीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांना धक्का असल्याचे समजले जात आहे. शिवराज सिंह सुमारे १७ वर्षांपेक्षा जास्त, वसुंधरा राजे दोन वेळा व रमण सिंह हेही १५ वर्षे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. 

तिन्ही नेते आपापल्या राज्यांमध्ये आताही दावेदारी करीत आहेत. तिन्ही नेत्यांनी आपापल्या कार्यकाळात अनेक योजना आणल्या होत्या. त्यांचा उल्लेख ते निवडणुकीत करू इच्छित होते. परंतु संपूर्ण निवडणूक नरेंद्र मोदी यांच्यावरच केंद्रित असेल व निवडणुकीत अन्य कोणता मुद्दा उपस्थित होऊ नये, यासाठीही नेत्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

तेलंगणा व मिझोराममध्येही भाजप संपूर्ण निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरच लढणार आहे. प्रादेशिक नेत्यांना नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व समोर ठेवण्यास सांगण्यात आले आहे. यामागचे कारण म्हणजे भाजपकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणचे सांगितले जात आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्व राज्यांत सर्वांत जास्त लोकप्रिय असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. तथापि, हा भाजपचा प्रयोग कर्नाटक व हिमाचल प्रदेशमध्ये पूर्णपणे अयशस्वी ठरला आहे. आता या पाच राज्यांत मोदी मॅजिक किती चालेल, हे लवकरच दिसणार आहे.

ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकांची घोषणानिवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की, ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात कधीही पाच राज्यांतील निवडणुकांच्या तारखांची घोषणा होऊ शकते. नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार आहेत व डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत या सर्व राज्यांत नवी सरकारे स्थापन होतील. निवडणुकांच्या तारखा जाहीर करताना सणवारांच्या तारखाही लक्षात घ्याव्या लागत आहेत. दसरा, दिवाळी, छठ पूजेसह अनेक महत्त्वाचे सण या काळात येणार आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी