शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

भाजपचा प्लॅन '144': लोकसभेच्या 'या' जागा जिंकण्यासाठी स्वतः पीएम मोदींनी हाती घेतली मोहिम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 20:52 IST

लोकसभा निवडणुकीला अजून बराच वेळ बाकी आहे, पण भाजपने यासाठी तयारी सुरू केली आहे.

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीला अजून बराच वेळ बाकी आहे, पण भाजपने यासाठी तयारी सुरू केली आहे. भाजपने देशातील त्या 144 लोकसभा जागांसाठी विशेष रणनीती आखली आहे, जिथे मोदी लाट असूनही 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. या जागा जिंकण्यासाठी पक्षाने पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची ड्युटी लावली आहे.

स्वतः मोदी 40 सभा घेणारहिंदी पट्ट्यातील यूपी-बिहार व्यतिरिक्त, पक्षाने तेलंगणा आणि ओडिशाच्या लोकसभा जागांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजपने 303 जागा जिंकल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाने मिशन 2024 साठी 350 जागांचे लक्ष्य ठेवले आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 40 जागांवर मेगा रॅली करणार आहेत. क्लस्टर प्रभारींना या रॅलींचे आयोजन करावे लागते. उर्वरित 104 जागांवर अमित शहा आणि जेपी नड्डा सभा घेणार आहेत.

144 जागा जिंकण्याची रणनीती काय?भाजपने 40 मंत्र्यांची स्वतंत्र टीम तयार केली असून त्याला क्लस्टर प्रभारी असे नाव देण्यात आले आहे. प्रत्येक मंत्र्याला लोकसभेच्या 2-3 जागा देण्यात आल्या आहेत. मंत्र्यांना राज्यसभेच्या खासदारांसह त्यांच्या जबाबदारीच्या लोकसभा मतदारसंघात जावे लागेल.मंत्र्यांची टीम भौगोलिक, आर्थिक, सामाजिक आणि जातीय समीकरणाची ब्लू प्रिंट तयार करेल. मतदारसंघातील संभाव्य उमेदवार ओळखण्याचे कामही देण्यात आले आहे.

त्या हॉट सीटवर लक्ष ठेवणार144 जागांमध्ये देशातील काही हॉट सीट्सचाही समावेश आहे, जिथे भाजपला कधीही विजय मिळवता आलेला नाही. यामध्ये उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि मैनपुरी, महाराष्ट्रातील बारामती, पश्चिम बंगालमधील यादवपूर, तेलंगणातील मेहबूब नगर आणि मध्य प्रदेशातील छिंदवाडा यांचा समावेश आहे.

टॅग्स :BJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदी