शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
2
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
3
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
4
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
5
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
6
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
8
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
9
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
10
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
11
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
12
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
14
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
15
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
16
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
17
Vijay Mallya : 'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
18
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
19
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?

भाजपच्या ‘मिशन 10’ समाेर कडवी आव्हाने, २०१९च्या निकालाची करणार का पुनरावृत्ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 11:57 IST

गेल्या निवडणुकीत भाजपने हरयाणातील सर्व १० जागा जिंकल्या होत्या.

- राकेश जोशीचंडीगड : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हरयाणात घडलेल्या विविध राजकीय, सामाजिक उलथापालथी पाहता आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ही आव्हाने मोडून काढताना २०१९ प्रमाणे विजयाची पुनरावृत्ती करणार का, याकडे राज्यातील जनतेचेच नव्हे, तर राजकीय क्षेत्रातील जाणकारांचे लक्ष लागले आहे.                                    

गेल्या निवडणुकीत भाजपने हरयाणातील सर्व १० जागा जिंकल्या होत्या. २०२४ मध्येही ‘मिशन १०’ साध्य करण्याचा भाजपचा मनोदय असला तरी यंदा पक्षापुढे आव्हानांचा डोंगर कायम आहे. गेल्या काही दिवसांत हरयाणातील भाजप आघाडी सरकारने शेतकरी आंदोलनाची केलेली हाताळणी, विविध घोटाळे, कुस्तीपटूंच्या मुद्द्यांवरून निर्माण झालेले वादळ यामुळे जनमानस घुसळून निघाले आहे.

लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नायब सैनी मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हरयाणा दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी या वेगवान घडामोडी घडल्या. त्यामुळे भाजप अडथळ्यांना दूर सारत गेल्या निवडणुकीप्रमाणे यश मिळवतो का, याचीच उत्सुकता आहे.

पुन्हा इतिहास रचणार?२०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने निकालात नुसता इतिहास रचला असे नव्हे, तर सर्वच्या सर्व दहाही जागांवर विजय मिळवताना विरोधकांना चारी मुंड्या चीत केले होते.त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपला इतिहासाची पुनरावृत्ती करता येईल का, याची उत्सुकता आहे. भाजपने गेल्या रणधुमाळीत ५८.०२ टक्के मते मिळवली. काँग्रेस पक्षाला केवळ २८.४२ टक्के मते मिळवता आली होती.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४haryana lok sabha election 2024हरियाणा लोकसभा निवडणूक निकाल २०२४