शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत भाजपाच्या विचारसरणीचा पराभव निश्चित; काँग्रेसला ठाम विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 06:43 IST

पक्षाची संघटना बांधणी मजबूत करण्याचे आव्हान

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : भाजपामुक्त भारत करण्यात काँग्रेसला अजिबात स्वारस्य नाही. भाजपाची एक विचारसणी आहे. तेव्हा भाजपाही असावा. तथापि, काँग्रेस आपल्या तत्त्वाने भाजपाची विचारसरणी पराभूत करेल. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस मित्र पक्षांच्या सहकार्याने भाजपा व मित्रपक्षांच्या तुलनेत निश्चित अधिक जागा जिंकेल, असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला आहे. परंतु आगामी निवडणुकीत काँग्रेसपुढे संघटन बळकट करण्याचे मोठे आव्हान आहे.संघटन अभावामागचे विश्लेषण काँग्रेसने केले असता २०१४ च्या आधी काँग्रेसने संघटना मजबूत करण्यावर लक्षच दिले नसल्याचे लक्षात आले आहे. गुजरात विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेस नेतृत्वाने संघटना बळकट करण्यावर भर दिला आहे.२०१४ मध्ये मोदींच्या राजवटीत भाजपाची रणनीती विरोधकांची प्रतिमा मलिन करण्यावर केंद्रित होती. परिणामी, राजकीय संवादाची प्रतिष्ठा खालावली. तथापि, वैचारिक मतभेद असतानाही पंतप्रधानांबाबत अपशब्द किंवा गैर बोलले जाणार नाही, याची काँग्रेसने नेहमीच दक्षता घेतली. परंतु दुर्दैवाने, पंतप्रधान मोदी यांची शैली आणि भाजपाने प्रचाराची वेगळीच पद्धत अंगीकारत याबाबत सौजन्यच राखले नाही. काँग्रेसने आपल्या भूमिकेने मोदींची रणनीती अपयशी केली. मात्र, भाजपाच्या तुलनेच प्रचारासाठी मर्यादित संसाधने असतानाही काँग्रेस भाजपाचा जोमाने मुकाबला करीत आहे.सर्व विरोधी पक्ष मिळून मोदींना पराभूत करणार, हे मात्र निश्चित, असा काँग्रेसला आत्मविश्वास आहे. बेरोजगारीमुळे युवकांत नाराजी आहे. नोटांबदीने देशाचे नुकसान झाले आहे. पण सरकार नोटबंदीचे फायदेही सांगत नाही. मुळात सरकारलाच अद्याप याचे आकलनच झालेले नाही.२०१४ मध्ये भाजप आणि संघाने पद्धतशीर प्रचार करून काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत देशभरात काँग्रेसविरुद्ध वातावरण निर्माण केले. राफेल घोटाळ्याचा मुद्दा संसदेत उपस्थित केला असता पंतप्रधान मोदी नजर भिडवू शकत नाहीत. कारण यात घोटाळा झालेला आहे, हे खरे आहे. काँग्रेस मात्र हा मुद्दा जनतेसमोर नेणार आहे. हा घोटाळा कसा झाला, हे जनतेच्या दरबारात सांगितले जाईल. घोटाळा कोणी आणि कसा केला, हे सरकार का सांगत नाही? असा सवाल काँग्रेस सातत्याने करत आहे.तीन राज्यांत पराभव करूमोदी यांना सत्तेबाहेर करणे शक्य नाही, असे काही लोक ठणकावून सांगत आहेत. तथापि, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी मोदींना सत्तेबाहेर केले जाईल, असा ठाम विश्वास काँग्रेसला आहे. या वर्षअखेर मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निकालातून मोदी यांना सत्तेबाहेर करण्यास काँग्रेसचा किती दृढसंकल्प आहे, हे सिद्ध होईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस