शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
2
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
3
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
4
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
5
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
6
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
7
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
8
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
9
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
10
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
11
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
12
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
13
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
14
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
15
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
16
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
17
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
18
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
19
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा

भाजपाच्या कार्यकारिणीची बैठक संपली, भ्रष्टाचारमुक्त भारताचा संकल्प, पीयूष गोयल यांचं प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 14:04 IST

भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीची दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियममध्ये सुरू असलेली बैठक समाप्त झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली असून, या बैठकीत भ्रष्टाचारमुक्त भारताचा संकल्प घेण्यात आला आहे. बैठकीला भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींसह पक्षाध्यक्ष अमित शाह व अरुण जेटलीही उपस्थित होते.

ठळक मुद्दे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीची दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियममध्ये सुरू असलेली बैठक समाप्त झाली 2019 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. बैठकीत भ्रष्टाचारमुक्त भारताचा संकल्प घेण्यात आला आहे. बैठकीला भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींसह पक्षाध्यक्ष अमित शाह व अरुण जेटलीही उपस्थित होते.

नवी दिल्ली, दि. 25 - भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीची दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियममध्ये सुरू असलेली बैठक समाप्त झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली असून, या बैठकीत भ्रष्टाचारमुक्त भारताचा संकल्प घेण्यात आला आहे. बैठकीला भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींसह पक्षाध्यक्ष अमित शाह व अरुण जेटलीही उपस्थित होते. तसेच गुजरात निवडणुकीत भाजपा ऐतिहासिक विजय संपादन करेल, असंही पीयूष गोयल म्हणाले आहेत. बैठकीत भारताच्या नवनिर्माणासंबंधी विस्तृत चर्चा झाल्याची माहिती रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे. भ्रष्टाचार, दहशतवाद, जातीयवाद आणि सांप्रदायिक वातावरण बिघडवणा-या शक्तींपासून भारताचा मुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. बैठकीत केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या राजकीय हिंसाचाराचाही निषेध नोंदवण्यात आला आहे. हिंसेनं भाजपाचा कोणताही कार्यकर्ता घाबरणार नाही, असंही पीयूष गोयल म्हणाले आहेत. भाजपा कार्यकर्ते शांती आणि लोकशाहीवर विश्वास ठेवतात. यावेळी राहुल गांधींवरही अमित  शाहांच्या माध्यमातून पीयूष गोयल यांनी निशाणा साधला आहे. भारतीय राजकारण हे सुशासनावर विश्वास ठेवतं, असंही पीयूष गोयल म्हणाले आहेत. 2019 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. तर दुस-या एका भाजपाच्या बैठकीत कोर ग्रुपच्या नेत्यांसह भाजपाचे 1400 आमदार, 337 खासदार आणि नगरसेवक सहभागी झाले होते. तसेच 2000हून अधिक लोकही या बैठकीत सामील झाले होते.

या बैठकीत आर्थिक परिस्थिती व गुजरात, हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुका यांवरही मंथन झाले आहे. गुजरात भाजपाच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. जे ठराव तिथे झालेत, त्यापैकी आर्थिक प्रस्तावात नोटाबंदी आणि जीएसटी अर्थव्यवस्थेसाठी कशाप्रकारे हिताचे आहे, ते सांगण्याचा प्रयत्न झाला आहे. महिला आरक्षण आणि रोहिंग्या शरणार्थी या मुद्द्यांवर चर्चा झालीय. जाहीर केलेले उत्पन्न आणि मालमत्ता यांच्यात सकृतदर्शनी तफावत आढळल्याने देशभरातील सात लोकसभा सदस्य व विविध राज्यांमधील 97 आमदारांची प्राप्तिकर विभागाकडून चौकशी सुरू असल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयास सांगितले.‘लोकप्रहरी’ या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या जनहित याचिकेच्या निमित्ताने हा विषय न्यायालयापुढे आला आहे. दोन निवडणुकांच्या वेळी केलेल्या प्रतिज्ञापत्रांचा हवाला देत या संस्थेने 27 लोकसभा सदस्य, 11 राज्यसभा सदस्य व 257 आमदारांच्या मालमत्तांमध्ये अल्पावधीत लक्षणीय वाढ झाल्याचे निदर्शनास आणले होते.‘सीबीडीटी’ने यापूर्वी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर न्या. जस्ती चेलमेश्वर व न्या. एल, अब्दुल नझीर यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली होती आणि लोकप्रतिनिधींच्या चौकशीच्या बाबतीत चक्रे संथगतीने फिरत असल्याचे बोलून दाखविले होते. त्यानंतर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात वरील माहिती देण्यात आली. ज्यांची चौकशी सुरू आहे, त्यांच्या नावांची यादी मंगळवारी सीलबंद लखोट्यात दिली जाईल, असेही ‘सीबीडीटी’ने सांगितले होते.‘सीबीडीटी’ने सांगितले की, याचिकाकर्त्यांनी दिलेल्या यादीपैकी 11 राज्यसभा सदस्य, 19 लोकसभा सदस्य व 159 आमदारांच्या प्रकरणे प्राप्तिकर विभागाच्या तपास शाखेने हाती घेतली. त्यापैकी सात लोकसभा सदस्य व 98 आमदारांनी जाहीर केलेले उत्पन्नाचे स्रोत व मालमत्ता यांचा सकृतदर्शनी मेळ बसत नसल्याचे दिसून आल्याने, पुढील तपास करण्यात येत आहे. मात्र, 19 लोकसभा सदस्य, दोन राज्यसभा सदस्य व 117 आमदारांच्या बाबतीत लक्षणीय तफावत प्रथमदर्शनी आढळली नाही.

टॅग्स :BJPभाजपाGujaratगुजरात