शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली महापालिका पोटनिवडणूकीत भाजपचा सूफडा साफ, 'आप'ला 4 जागा

By महेश गलांडे | Updated: March 3, 2021 12:07 IST

त्रिलोकपुरी, शालीमार बाग वार्ड, रोहिणी-C आणि कल्याणपुरी या वार्डांत आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर, पूर्व दिल्लीच्या चौहान बांगड जागेवर काँग्रेसच्या उमेदवाराने बाजी मारली आहे

नवी दिल्ली - गुजरातमधील पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकींत भाजपाने निर्विवाद वर्चस्व मिळवले. मात्र, राजधानी दिल्लीतील महापालिकेच्या 5 वार्डात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचा सुफडा साफ झाला आहे. या 5 पैकी 4 जागांवर आम आदमी पक्षाने विजय मिळवला असून एका जागेवर काँग्रेसला यश संपादन करता आले. आपच्या या विजयाबद्दल दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी आनंद व्यक्त केला असून हा मोठा विजय असल्याचं म्हटलंयय.  

त्रिलोकपुरी, शालीमार बाग वार्ड, रोहिणी-C आणि कल्याणपुरी या वार्डांत आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर, पूर्व दिल्लीच्या चौहान बांगड जागेवर काँग्रेसच्या उमेदवाराने बाजी मारली आहे. 28 फेब्रुवारी रोजी नगरपालिकच्या वार्डातील 5 जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यामध्ये, 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते. सध्या पोटनिवडणूक झालेल्या 5 पैकी 4 जागांवर यापूर्वी आम आदमी पक्षाचेच नगरसेवक होते, तर, एका जागेवर भाजपचा नगरसेवक होता. दिल्लीच्या जनतेनं 5 पैकी 4 उमेदवारांन निवडून देत अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास दाखवला आहे. गेल्या 15 वर्षांपासूनच्या भाजपा सरकारच्या कार्यकाळात दिल्लीची जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळेच, पुढील वर्षात होणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्येही अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास दाखवत जनता, भाजपाचा सूफडा साफ करेल, असे मनिष सिसोदिया यांनी म्हटलंय.  

दरम्यान, गेल्या 15 वर्षात महापालिका निवडणुकांमध्ये यापूर्वी कधीही भाजपाचा पराभव झाला नाही. त्यामुळे, ही पोटनिवडणूक अतिशय महत्त्वाची होती. दिल्लीच्या जनतेनं 2022 च्या निवडणुकांसाठी हा संदेश दिल्याचे आम आदमी पक्षाचे महापालिका निवडणूक प्रभारी दुर्गेश पाठक यांनी म्हटलं. 

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप