शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

राज्यसभेत भाजपचे शतक, 1988 नंतर 101 चा आकडा गाठणारा एकमेव पक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 07:36 IST

ईशान्येकडून ४ उमेदवार विजयी, आसाम, त्रिपुरा आणि नागालँड या ईशान्येकडील तीन राज्यांमध्ये भाजपने ४ जागा जिंकल्या आहेत

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीचे ४ उमेदवार राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पक्षाचे संख्याबळ आता १०१ झाले असून, शतक गाठणारा १९८८ नंतरचा पहिलाच पक्ष ठरला आहे.

आसाम, त्रिपुरा आणि नागालँड या ईशान्येकडील तीन राज्यांमध्ये भाजपने ४ जागा जिंकल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, ईशान्येकडील  राज्यातून राज्यसभेत प्रथमच काँग्रेसचा एकही उमेदवार विजयी झालेला नाही. आसाममधून भाजपच्या पवित्र मार्गारिटा आणि युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल पक्षाच्या रंग्रा नरजारी यांनी विजय मिळविला आहे. मार्गरिटा यांना ४६, तर नरजारी यांना ४४ मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान राज्यसभा सदस्य रिपुन बाेरा यांना ३५ मते मिळाली. बाेरा यांचा कार्यकाळ २ एप्रिलला संपणार आहे. नागालँडमधून भाजपच्या उमेदवार एस. फांगनाॅन यांची बिनविराेध निवड झाली आहे. या राज्यातून प्रथमच राज्यसभेवर महिला प्रतिनिधित्व मिळाले आहे, तर त्रिपुरामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष माणिक साहा यांनी माकपचे उमेदवार व आमदार भानूलाल साहा यांचा पराभव केला.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी समीकरण बदललेn राज्यसभेत भाजपचे संख्याबळ १०० हून अधिक झाले आहे. याचा आगामी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर परिणाम हाेणार आहे. n अनेक विराेधक निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर फेकल्या गेले आहेत. आपचेही संख्याबळ वाढले आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये हाेणाऱ्या निवडणुकीसाठी समीकरण बदलले आहे.

आपचे संख्याबळ वाढलेn पंजाब विधानसभेत माेठे यश मिळविल्यानंतर आम आदमी पार्टीचेही राज्यसभेतील संख्याबळ वाढले आहे. n आपने पंजाबमधील पाचही जागा जिंकल्या आहेत. n त्यामुळे आपचे ८ सदस्य राज्यसभेत झाले आहेत. 

टॅग्स :BJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाVenkaiah Naiduव्यंकय्या नायडूMember of parliamentखासदार